Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Quota : केंद्राचा नोव्हेंबरसाठी २२ लाख टनांचा साखर विक्री कोटा

Sugar Update : दिवाळीसाठीच्या साखर विक्रीबाबत भ्रमनिरास झाल्याने अनेक कारखान्यांचा ऑक्टोबरचा विक्री कोटा २० टक्क्यांपर्यंत शिल्लक आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : दिवाळीसाठीच्या साखर विक्रीबाबत भ्रमनिरास झाल्याने अनेक कारखान्यांचा ऑक्टोबरचा विक्री कोटा २० टक्क्यांपर्यंत शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर साखर केंद्राने साखर कारखान्यांना २२ लाख टनांचा विक्री कोटा नोव्‍हेंबरसाठी दिला आहे. ऑक्टोबरची विक्री न झालेली साखर, नोव्हेंबरचा कोटा व नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून तयार होणारी यंदाच्या हंगामाची साखर अशा परिस्थितीत पुरेशा साखर विक्रीचे आव्हान कारखान्यांपुढे आहे.

केंद्राने दिवाळीसाठी ऑक्‍टोबरला २५ लाख टनांचा कोटा दिला होता, पण अपेक्षित मागणी न आल्याने साखरेचे दर मंदीतच राहिले. यामुळे कोट्याएवढी साखर विक्री करता आली नाही. राज्याबरोबरच परराज्यातूनही मागणी आली नाही यामुळे साखरेची विक्री मर्यादितच राहिली. महाराष्ट्रातील साखरेपेक्षा उत्तरेकडील राज्यांकडून साखर घेतल्‍यास त्याचा वाहतूक खर्च क्विंटलमागे १०० ते १५० रुपये येत असल्याने देशातील अन्य राज्यांतून उत्तरेकडील साखरेलाच यंदाही अधिक मागणी राहिली.

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ साठी पहिल्या टप्प्यात १५ लाख व दुसऱ्या वेळी ८ लाख असा एकूण २३ लाख टनांचा कोटा जाहीर केला होता. गत वर्षीच्या तुलनेत १ लाख टनांनी कोटा कमी असला तरी सध्या मागणी घटली आहे. यामुळे दर ३४०० ते ३५०० रुपयापर्यंत खाली आले आहेत.

दिवाळीसाठीची खरेदी चार दिवसांपूर्वीच आटोपली असून कारखान्यांना साखरेला अपेक्षित दरवाढ मिळाली नाही. यंदाचा साखर हंगाम केवळ पंधरा दिवसांवर आलेला असताना दराअभावी साखर उद्योगात फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे. यातच केंद्राकडून एमएसपी वाढवणार नाही असे संकेत आल्याने व्यापारी ही साखर खरेदी करण्यास फारसे खूश नसल्याचे चित्र साखर बाजारपेठेत आहे.

महिन्यापूर्वी एमएसपी वाढीची चर्चा बाजारात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करून ठेवली. दसऱ्याच्या वेळी साखरेला काही प्रमाणात उठाव होता पण हे वातावरण फार टिकले नाही. एमएसपी वाढीची चर्चा व दिवाळीचा हंगाम यामुळे दर दिवाळीला चांगले राहतील अशी अटकळ कारखानदारांची होती. इतर राज्यांकडूनही मागणी अपेक्षित होती. दिवाळी तोंडावर मागणी न आल्याने साखर उद्योग चिंताग्रस्त बनला आहे. अनेक कारखान्यांना दिवाळीच्या दरम्यान देशातील अन्य राज्यांकडूनही मागणी येत असते, पण यंदा या मागणीत ही घट झाल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

हंगाम सुरू होण्याआधी धक्का

ऐन दिवाळीच्या धामधुमीत ही अनेक साखर कारखाने खरेदीदाराच्या प्रतीक्षेत असल्याचे सध्याचे चित्र आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी असल्याने कारखाने सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत तातडीने एफआरपीची रक्कम कारखान्यांना द्यावी लागणार आहे. यासाठी सध्या साखर विक्री जोरात होणे गरजेचे असताना तशी परिस्थिती नसल्याने यंदाचा हंगाम सुरू होण्याआधीच हा धक्का असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT