Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अकोल्यात सोयाबीनला सरासरी ४००५ रुपये प्रति क्विंटलचा दर

Soybean Rate : सोयाबीनचा कमीत कमी दर ३४०० तर कमाल दर ४२९० रुपये एवढा आहे. अकोल्यात सोमवारी (ता. २५) बाजारात सोयाबीन सरासरी ४००५ रुपये दराने विक्री झाली.

 गोपाल हागे

Akola News : यंदाच्या संपूर्ण हंगामात सोयाबीनचे दर वाढलेले नाहीत. निवडणुकीच्या रणधुमाळीच चर्चेत राहिलेली सोयाबीन बाजारपेठांमध्ये अद्यापही कमी दरानेच विकते आहे. सोयाबीनचा कमीत कमी दर ३४०० तर कमाल दर ४२९० रुपये एवढा आहे. अकोल्यात सोमवारी (ता. २५) बाजारात सोयाबीन सरासरी ४००५ रुपये दराने विक्री झाली.

बाजारात गेले काही दिवस सोयाबीनचे दर कमालीचे दबावात आहेत. दरवाढ होईल या हेतूने अनेकांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती. मात्र, बाजाराच्या कलवाढीकडे दिसत नसल्याने आता शेतकरी विक्रीकडे वळत आहेत.

अकोला बाजारात सोमवारी (ता. २५) १२७४ क्विंटलची आवक झाली होती. गेले काही दिवस निवडणुकीच्या धुमाकुळाचा परिणाम बाजारपेठांवर झालेला होत. आता रणधुमाळी संपल्याने बाजारातील आवक वाढण्यास सुरुवात झाली होती.

तूर विकली साडेसात हजारांत

बाजारात तुरीचा किमान दर ५०१५ रुपये तर कमाल दर १०२०५ रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला. बाजारात तुरीचा सरासरी दर ७६०० रुपये एवढा होता. आवक सध्या जेमतेम २११ क्विंटलपर्यंत झाली होती.

सोयाबीनप्रमाणेच तुरीचा दर गेल्या काही दिवसांत खालीवर होत आहेत. बाजारात हरभऱ्याची किमान ४९८५ व कमाल ६३८५ रुपये दराने विक्री झाली. सरासरी ५८५५ रुपयांचा हरभऱ्याचा दर होता. बाजारात आवक दीडशे क्विंटलपेक्षा कमी झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT