Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : नव्या सोयाबीनची आवक सुरू

Soybean Rate : गावासह परिसरात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. नव्या सोयाबीनची मंगळवारी (ता. २६) आठवडे बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे आवक सुरू झाली.

Team Agrowon

Jalana News : गावासह परिसरात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. नव्या सोयाबीनची मंगळवारी (ता. २६) आठवडे बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे आवक सुरू झाली. नव्या सोयाबीनला ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. जवळपास ३० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

पिंपरखेड तालुका घनसावंगी येथील शेतकरी लिंबाजी सोपान डोईफोडे यांनी १३ जून ला सोयाबीनची लागवड केली होती. ही सोयाबीन काढून बाजारात विक्रीसाठी आणली. दरम्यान, पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला असून, उत्पादनातही मोठी घट आली आहे.

अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन काढणे अजूनही बाकी आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू आहे. घरात सोयाबीन न ठेवता शेतकरी मिळेल त्या भावाने विक्रीसाठी लगेच बाजारात घेऊन येत आहेत. येथील व्यापारी अविनाश शिंदे यांच्या दुकानात बुधवारी नव्या सोयाबीनचे खरेदीला सुरुवात झाली.

या वेळी बाजार समितीच्या वतीने शेतकरी लिंबाजी डोईफोडे यांचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे केंद्रप्रमुख राहुल गुजर आर. ए. शिंदे विलास गाढे दत्ता बिलोरे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारीही (ता. २७) बाजारात जवळपास १५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर दर ४७०० रुपये प्रतिक्विंटल स्थिर होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT