Flower Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Flower Market : जळगावात झेंडू फुलांची आवक वाढली; दर ४५ रुपये

Marigold Flower Market : झेंडू फुलांची आवक मागील पंधरवड्यात कमी होती. आठ दिवसांपूर्वी झेंडू फुलांना काही दिवस ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता.

Team Agrowon

Jalgaon News : शहरातील वल्लभदास वालजी (व.वा.) व्यापारी संकुलातील फूल बाजारात झेंडू फुलांची आवक वाढली आहे. या आठवड्यात प्रतिदिन सरासरी १४ क्विंटल आवक झाली असून, दर ४० ते ६० व सरासरी ४५ रुपये प्रतिकिलो, असे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

झेंडू फुलांची आवक मागील पंधरवड्यात कमी होती. आठ दिवसांपूर्वी झेंडू फुलांना काही दिवस ६० ते ७० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. गणेशोत्सवाच्या सुरवातीला चांगला उठाव होता. परंतु गणेशोत्सवाच्या काळात आवक वाढली. कलकत्ता व इतर प्रकारच्या झेंडूलाही मागणी आहे.

मागील पंधरवड्यातील आवक प्रतिदिन सरासरी ११ क्विंटल होती. या आठवड्यातील आवक मात्र काहीशी वाढलेली दिसत आहे. कलकत्ता प्रकारच्या झेंडूचे दर अधिक किंवा ५० रुपये प्रतिकिलोवर आहेत. झेंडूची आवक जळगाव तालुक्यातील आसोदा, नशिराबाद, शिरसोली यासह धुळे, बुलडाणा आदी भागांतून होत आहे.

मध्यंतरी म्हणजेच ६ ते ८ जुलै दरम्यान अतिपावसाने अनेक भागात झेंडू फुलांचे नुकसान झाले. या काळात काढणीदेखील ठप्प होती. परिणामी बाजारातील आवक कमी झाली. परंतु मागील काही दिवस पाऊसमान कमी राहिले.

त्यामुळे झेंडू फुलांची वाढ, काढणी, पुरवठा यासंबंधीची कार्यवाही सुरळीत होत आहे. पुढे नवरात्रोत्सव, दसरा सण आहे. या कालावधीत फुलांची मागणी अधिक राहील. यामुळे आवक वाढली तरीदेखील दर टिकून राहतील किंवा त्यात वाढदेखील होऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गुलाब फुलांच्या दरात घसरण

गुलाबाच्या फुलांचे दर मागील पंधरवड्यात पाच ते सहा रुपये प्रतिनग असे होते. परंतु या आठवड्यात दर दोन रुपये प्रतिनग असे आहेत. गुलाब फुलांची आवकदेखील वाढली आहे.गुलाबाची आवक आणखी वाढेल, असेही संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Fraud: ‘कृषी’च्या ड्रम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

Urea Hoarding Case: युरियाची साठेबाजी उघड; दोन कृषी केंद्रांवर कारवाई

Mini Tractor Distribution: लोहीग्राममध्ये समाधान शिबिरात मिनी ट्रॅक्टरचे वाटप

Farmer Dispute Resolve: पोलिस आता रात्रीच्या वेळीही शेतकऱ्यांच्या बांधावर

Lemon Mosambi Procurement: ‘नाफेड’तर्फे लिंबू, मोसंबी खरेदी करावी: शेतकरी सहकारी संघ

SCROLL FOR NEXT