Maize Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : खरीप मक्याची आवक सुरू

Maize Cultivation : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव, देवळा तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात आगाप मका लागवडी केलेल्या होत्या.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव, देवळा तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात आगाप मका लागवडी केलेल्या होत्या. हा मका काढणी होऊन बाजारात आला आहे. सध्या मालेगाव, नांदगाव बाजार समित्यांमध्ये गेल्या सप्ताहापासून आवक सुरू झाली आहे. त्यास सरासरी २२०० ते २२७१ दरम्यान दर मिळत आहे.

शेतकऱ्यांनी मे महिन्यात आगाप मका लागवड विहिरीतील संरक्षित पाणीसाठ्यावर केली होती. त्यानुसार पुढे पाऊस सुरू झाल्यानंतर या मका पीक वाढीस लागल्याने दिलासा मिळाला. आता परिपक्व झालेली मका सोंगणीनंतर मळणी करून काही शेतकरी मका बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सध्या आवक होणारा मका ओला आहे. तर आवक ८ ते १० वाहनांमधून २०० ते २५० क्विंटल होत आहे.

सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांचे आवार खासगी केंद्रावर खरेदी सुरू झाली आहे. मागील सप्ताहात मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन मका ऑगस्ट महिन्यात विक्रीसाठी येण्याची पहिलीच वेळ आहे. बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे यांच्या हस्ते लिलावाची सुरुवात झाली. हिरे यांनी कळमधरी (ता. नांदगाव) येथील सचिन आहेर या शेतकऱ्याच्या मक्याची पूजा करून श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. नवीन काढणी झालेल्या ओल्या मक्यास मुहूर्ताच्या लिलावात २ हजार ५१ रुपये भाव मिळाला होता.

या वेळी बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण, माजी सभापती काशिनाथ पवार, व्यापारी संचालक भिका कोतकर, अरुणा सोनजकर, संजय निकम, विठोबा छरंग, शाम सोनार, रवींद्र साळुंके, अरुण अहिरे, प्रशांत देवरे, लकी खैरनार, सचिव कमलेश पाटील, व्यापारी सुनील शिनकर, गोपाल अग्रवाल, भूषण पांडे, सागर लिंगायत, जितेंद्र मालपूरे, अनिल बेलन आदी उपस्थित होते.

कुक्कुटखाद्यासाठी खासगी केंद्रावर खरेदी

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापासून बहुर परिसरातील कुक्कुट खाद्य उत्पादक करणाऱ्या कारखान्यांकडून नवीन खरीप माशाची मक्याची खरेदी सुरू झाली. तेथे मुहूर्ताला २५०० रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी २२५० ते २३०० दरम्यान दर मिळत आहे, असे भऊर (ता. देवळा) मका उत्पादक शेतकरी दुष्यंत पवारांनी सांगितले.

बाजार समिती किमान कमाल सरासरी

नांदगाव २११० २३६८ २२७१

मालेगाव १९०० २३०० २२००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT