Rice Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rice Export : बासमती तांदळाचे ९५० डाॅलर किमान निर्यात मूल्य काढले; निर्यातीला गती मिळणार 

Rice Market Update : केंद्र सरकारने बासमती तांदूळवरील किमान निर्यात मूल्य काढले. पुढील काही दिवसांमध्ये नव्या हंगामातील बासमती तांदूळ सुरु होणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने बासमती तांदूळवरील किमान निर्यात मूल्य काढले. पुढील काही दिवसांमध्ये नव्या हंगामातील बासमती तांदूळ सुरु होणार आहे. सरकारने ९५० डाॅलर किमान निर्यात मूल्य काढल्याने निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे देशातील भाव वाढून शेतकऱ्यांनाही आधार मिळेल.

देशात तांदळाचे उत्पाद घटल्यानतर भाव वाढले होते. त्यामुळे सरकारने तांदूळ निर्यातीवर बंधने घालणे सुरु केले. सरकारने ९ सप्टेंबर २०२२ रोजी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावले होते. त्यासोबतच बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य १२०० डाॅलर प्रतिटन केले होते. त्यानंतर किमान निर्यात मूल्य कमी करून ९५० डाॅलर प्रतिटन केले होते. 

भारतात दरवर्षी ४० ते ५० लाख टनांच्या दरम्यान बासमती तांदळाची निर्यात करत असतो. पण भारत सरकारने बासमती तांदूळ निर्यातीसाठी किमान किंमत ९५० डाॅलर प्रतिटन केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात बासमती तांदळाचा भाव ७०० डाॅलर प्रतिटनांच्या दरम्यान कमी झाला. म्हणजेच भारताच्या बासतमती तांदळाचे भाव जास्त होते. त्यामुळे देशातून निर्यात थंडावली होती. पण नवा माल बाजारात येत असल्याने शतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण सरकारने आता किमान निर्यात मूल्य काढल्याने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

देशात नव्या बासमती तांदळाचा पुरवठा वाढल्यानंतर भाव नरमले होते. शेतकऱ्यांच्या तांदळाला चांगला भाव मिळावा यासाठी लादलेले ९५० डाॅलर किमान निर्यातमूल्य काढावे अशी मागणी सुरु होती. त्यातच महिनाभरात नवा मालही बाजारात येणार होता. त्यामुळे या मागणीने चांगलाच जोर धरला होता. कारण एकीकडे भात इंधन आणि खताचे भाव वाढत असताना भाताचे भाव पडले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमी झाले होते. या कारणाने किमान निर्यात मूल्य काढण्याची मागणी शेतकरीही करत होते.

सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर शुल्क काढले. त्यामुळे देशातून बासमती तांदूळ निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. परिणामी देशातील बासतमी तांदूळ उत्पादकांना चांगला भाव मिळू शकतो. चांगला भाव मिळाला तर पुढच्या हंगामात जास्त लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

जगभरात बासमती तांदळाचे उत्पादन भारत आणि पाकिस्तानमध्येच होते. दोन्ही देश आपल्या बासमती तांदळाचा प्रिमियम ग्रेड मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतात. भारतातही बासमती तांदूळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही. तसेच सरकारही तांदळाच्या इतर वाणांप्रमाणे तांदळाची रेशनसाठी खरेदी करत नाही. त्यामुळे निर्यातीचे मार्केट बासमतीच्या दरासाठी आवश्यक असते. आता सरकारने किमान निर्यात मूल्य काढल्याने भारताची बासमती तांदूळ निर्यात वाढेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानच्या बासमतीला भारताचा बासमती तांदूळ स्पर्धा देईल, तसेच आपले हक्काचे ग्राहक टिकून राहतील, असे निर्यातदारांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT