Market Update  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : मक्याचा बाजार टिकून; कापूस, सोयाबीन, मका, तसेच कांदा दर काय आहेत?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, मका आणि उडीद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून आले. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १२.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३६७ डाॅलर प्रतिटनांवर होते.

सोयातेलाच्या भावातही काहीशी सुधारणा झाली होती. देशातील भावपातळी मात्र कायम आहे. देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसाच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत नरमाई आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा ८० सेंटच्या खाली आले. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ७७.३८ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदेही कमी होऊन ५८ हजारांच्या खाली आले.

आज दुपारी वायदे ५७ हजार ६०० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावापतळीही ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकत, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

राज्यातील अनेक बाजारांमधील कांद्याची सरासरी आवक कमी दिसत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. पण आजही अनेक बाजारात कांद्याचा किमान भाव ५०० रुपयांपेक्षाही कमी मिळत आहे.

तर चांगल्या कांद्याचा भाव २ हजारांच्या दरम्यान दिसतो. पण सरासरी दरपातळी की ज्या भावात जास्तीत जास्त कांदा विकला जातो तो भाव १३०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे, यापुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे.

मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उडदाचे भाव टिकून आहेत. उडदाची बाजाराील आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे मागणी चांगली आहे. सरकारने उडदाचे भाव कमी कऱण्यासाठी अनके निर्णय घेतला.

पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे भाव पाडता आले नाहीत. सध्या उडदाचा भाव ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT