Sugar Production  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

India Sugar Production 2025: देशातील साखर उत्पादनात ५७ लाख टनांची घसरण!

Sugar Industry Report: देशात अजूनही ३७ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. १५ एप्रिलअखेर गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात ५७ लाख टनांची घट असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: देशात अजूनही ३७ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. १५ एप्रिलअखेर गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात ५७ लाख टनांची घट असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिली आहे.

त्यांच्या २७१३.२८ लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे, यातून २५४.२५ लाख टन साखर उत्पादन झाले. मागील हंगामात याच कालावधीत, ७४ साखर कारखाने कार्यरत होते. गाळप ३०६६.२० लाख टनांपर्यंत पोहोचले होते. ज्यातून ३११.६५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

साखर संघाच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या हंगामात ५३३ साखर कारखान्यांनी गाळपाच्या कामात भाग घेतला. गेल्या हंगामात ५३५ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत देशातील साखरेच्या पुनर्प्राप्तीचा(रिकव्हरी) दर कमी आहे. या कालावधीत दर ९.३७ टक्के आहे, जो मागील हंगामात याच कालावधीत १०.१६ टक्के होता.

उत्पादनाच्या बाबतीत, महाराष्ट्रातील कारखान्यांनी ८४८.९५ लाख टन ऊस गाळप केला असून ज्यातून ८०.६५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात, साखर कारखान्यांनी ९३७.६३ लाख टन ऊस गाळप केले असून ज्यातून ९०.९५ लाख टन साखर उत्पादन मिळाले आहे. साखर संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकमध्ये ४७५.२९ लाख टन ऊस गाळप केल्यानंतर साखर उत्पादन ४०.४० लाख टनांवर पोहोचले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये साखर उत्पादनात घट झाल्यामुळे या गाळप हंगामातील उत्पादनात घट झाल्याचे चित्र याही कालावधीत आहे. गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन ३१९ लाख टन झाले होते. यंदाच्या सरत्या हंगामात ते २५९ लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात एक कारखाना सुरू

उत्तर प्रदेशात सध्या सर्वाधिक २२ साखर कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत या राज्यात ३४ साखर कारखाने सुरू होते. महाराष्ट्रात केवळ एक कारखाना सुरू आहे. मागील वर्षी १८ कारखाने सुरू होते. कर्नाटकचा पूर्ण हंगाम संपला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT