Sugar Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Production: गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी साखरनिर्मितीत घट

Maharashtra Sugar Industry: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील साखर उत्पादन ५४ लाख टनांनी घटले आहे. साखर उताराही घसरला असून अनेक कारखाने वेळेपूर्वीच बंद झाले आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील साखर उद्योगावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: देशातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत अंतिम टप्प्‍यात ५४ लाख टन साखर कमी उत्पादित झाली आहे. मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १९४ साखर कारखाने बंद झाले आहेत. त्या खालोखाल कर्नाटकात सर्व ७२, तर उत्तर प्रदेशात ६५ कारखाने बंद झाले आहेत. मार्चअखेर २४८ लाख टन साखरेची निर्मिती झाली.

गेल्या वर्षी याच कालावधीत ३०२ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षी या कालावधीत २९८१ लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा २६६३ लाख टन उसाचे गाळप झाले. महाराष्ट्र गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ लाख टनांनी पिछाडला आहे. उत्तर प्रदेशही १० लाख टनांनी मागे आहे.

या हंगामात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ८७ लाख टन साखरेची निर्मिती झाली. त्‍या खालोखाल महाराष्ट्रात ८० लाख टन साखर तयार झाली. गेल्या वर्षी ५३५ कारखान्‍यांनी हंगाम सुरू केला होता. यंदा ५३३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. सध्या ११३ कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या २०४ इतकी होती.

देशाचा साखर उताराही घटला

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशाचा साखर उताराही घटला असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी साखर उतारा १०.१५ टक्के इतका होता. यंदा यात घसरण होऊन तो ९.३७ टक्क्यांवर आला आहे. प्रत्येक राज्यात सरासरी अर्ध्या ते एक टक्क्याने साखर उतारा घटला आहे. हंगामाची सध्याची स्‍थिती पाहता देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० लाख टन साखर कमी उत्पादित होईल, असा अंदाज सहकारी साखर कारखाना महासंघाचा आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या हंगामाच्‍या तुलनेत १५ लाख, महाराष्ट्रात ३० लाख, तर कर्नाटकात १२ लाख टन साखरेची कमी निर्मिती होईल, असा अंदाज महासंघाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात केवळ ६ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्‍हापूर, सोलापूरचा पूर्ण हंगाम संपला आहे. अन्य विभागांनीही गाळप आटोपले असून विभागांत एखाद दुसरा कारखाना सुरू असल्याचे चित्र मार्च अखेरचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT