Sugar Industry Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar MSP Hike : साखर उद्योगात ‘फील गुड’;आता एमएसपी वाढीकडे डोळे

Sugar Industry : केंद्राने दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी देऊन साखर उद्योगासाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सकारात्मक निर्णय घेत असल्याचे संकेत दिल्याने आता बहुचर्चित साखरेच्या एमएसपी वाढ व इथेनॉल विक्री दराच्या वाढीकडेही साखर उद्योगाचे डोळे लागले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने दहा लाख टन साखर निर्यातीस परवानगी देऊन साखर उद्योगासाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सकारात्मक निर्णय घेत असल्याचे संकेत दिल्याने आता बहुचर्चित साखरेच्या एमएसपी वाढ व इथेनॉल विक्री दराच्या वाढीकडेही साखर उद्योगाचे डोळे लागले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे मरगळलेल्या साखर बाजारात तेजीचे वारे येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून साखरेच्या बाजारात फारसा उठाव नाही. संक्रांतीच्या दरम्यान १०० रुपयांची वाढ साखरेला मिळाली. पण अपेक्षित मागणी साखरेला नव्हती. यातच केंद्र सरकार यंदाच्या हंगामात कोणताच निर्णय घेत नसल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम साखर बाजारावर होता.

केंद्राने दिलेला कोटा हा फार नसला तरी बाजारातील हालचाल वाढविण्‍यासाठी मात्र पूरक ठरला आहे. सध्या साखरेचे उत्पादन मंदावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस लाख टनांनी साखर हंगाम मागे आहे.

यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होईल हे निश्‍चित आहे. सध्याचे कमी होणारे साखरेचे उत्पादन, इथेनॉलकडे वळणारी साखर व निर्यातीचा निर्णय या एकत्रित वातावरणाचा परिणाम साखरेचे स्थानिक बाजारातील दर वाढण्यावर होऊ शकतो, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे.

केंद्राने सकारात्मक निर्णय घेतला की बाजारही वधारतो असे चक्र आहे. केंद्राने हालचाली करताच साखरेचे भाव दोन दिवसांत १०० रुपयांनी वाढले. ही साखर उद्योगासाठी सकारात्मक बाब ठरली आहे. यंदा २८० ते २९० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. निर्यातीच्या निर्णयाचे स्वागत करत असताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ व ‘इस्मा’ने एमएसपी वाढ व इथेनॉल विक्री दर वाढवावेत, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT