Strawberry Season Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Strawberry Season : समाधानकारक दरामुळे स्ट्रॅाबेरी हंगाम दिलासादायक

Strawberry Market Rate : देशभरात प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरी समाधानकारक दरामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. या हंगामात स्ट्रॉबेरीला सरासरी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.

विकास जाधव 

Satara News : देशभरात प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरी (Strawberry Rate) समाधानकारक दरामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. या हंगामात स्ट्रॉबेरीला सरासरी ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे सरासरी पाच ते दहा रुपये दरात वाढ झाली आहे. मात्र वन्यप्राणी, गारपिटीसह अवकाळी पावसामुळे एकूण हंगामाच्या २० टक्के स्ट्रॅाबेरीचे नुकसानही झाले आहे.

स्ट्रॅाबेरी हे थंड हवेत येणारे फळ असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॅाबेरीला देशभरातून मागणी असते. या हंगामात मातृवृक्ष वेळेत असल्याने रोपे तयार होऊन वेळेत स्ट्रॅाबेरीची लागवड झाली. या हंगामात महाबळेश्वर तालुक्यात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर लागवड झाली असल्याचा अंदाज आहे.

हंगामाच्या सुरवातीस स्ट्रॅाबेरी चांगला दर मिळतो. याही हंगामात २०० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर टप्पाटप्याने दरात घट होत जाते. एकूण हंगामाच्या सरासरी दराचा कल बघता ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला आहे. गतवर्षी ५० ते ५५ रुपये सरासरी दर होता.

महाबळेश्वर तालुक्यातून एका हंगामात सरासरी ३० ते ३५ हजार मेट्रीक टन स्ट्रॅाबेरीचे उत्पादन मिळते. या हंगामात उत्पादनात घट झाली असली तरी दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, असे शेतकरी एप्रिल, मेपर्यंत स्ट्रॅाबेरी पीक घेतात.

पर्यटकांना मिळणार नाही स्टॉबेरीचा स्वाद

महाबळेश्वर तालुक्यात जंगल मोठे असल्याने येथे वन्यप्राण्याकडून स्ट्रॅाबेरीला लक्ष केले जाते. स्ट्रॅाबेरी याही हंगामात वन्यप्राणी, अवेळी झालेला पाऊस तसेच नुकत्याच झालेल्या गारपिटीचा स्ट्रॅाबेरीस फटका बसला आहे.

एकूण हंगाम बघता २० टक्के उत्पादनात घट झाली आहे. मागील दोन दिवसांतील गारपिटीने स्ट्रॉबेरीला फटका बसला आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात येणाऱ्या पर्यटकांना स्ट्रॅाबेरी मिळणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

Rain Updates : पावसाची जोरदार हजेरी; हलका दिलासा

Kisan Sabha Protest: मंत्र्यांना तहसीलदारांमार्फत काजू, बदाम पाठवत संताप व्यक्त, किसान सभेची राज्यभर आंदोलने

Crop Damage : पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

SCROLL FOR NEXT