Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dalimb Market Price: "डाळिंबाच्या दरात स्थिरता; फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मृगबहार विक्री अंतिम टप्प्यात!"

Fruit Market: राज्यातील मृग बहारातील डाळिंब विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात डाळिंबाचे दर टिकून आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो १५० ते १८० रुपये असा दर आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: राज्यातील मृग बहारातील डाळिंब विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात डाळिंबाचे दर टिकून आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो १५० ते १८० रुपये असा दर आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाचे दर चांगले राहिले. त्यामुळे डाळिंबाची दरामुळे गोडी वाढली असून शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

राज्यात यंदा मृग बहारात ४५ हजार हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा साधल्या. सद्यःस्थितीला अंदाजे १५ टक्के म्हणजे साडेसहा हजार हेक्टरवरील डाळिंबाची विक्री बाकी आहे. बाजारात डाळिंबाची मागणीही चांगली असून उठावही होत आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असल्याने बाजारात डाळिंबाची आवक कमी अधिक होत आहे. त्यामुळे दरही चांगले राहिले आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला डाळिंबाला प्रति किलो १०० रुपये असे दर होते. या दरम्यान, डाळिंबाची आवक कमी असून मागणीही कमी होती. त्यामुळे डाळिंबाचे दर दबावात होतो. त्यानंतर डाळिंबाच्या दरात वाढ झाली. मात्र, नोव्हेंबर महिन्यात परराज्यातील डाळिंब राज्यभरातील डाळिंब बाजारपेठेत विक्रीला दाखल झाली. परिणामी पुन्हा डाळिंबाचे दर चाळीस टक्क्यांनी घसरले. या दरम्यान, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक फटका बसला.

डिसेंबर परराज्यातील डाळिंबाची आवक मंदावली. बाजारपेठेत डाळिंबाची मागणी वाढली. त्यामुळे डाळिंबाच्या दरात पुन्हा वाढ झाली. या दरम्यान, डाळिंबाला प्रति किलोस १३० ते १८० रुपये असा दर मिळाला. गेल्या महिन्याभरापासून डाळिंबाचे दर टिकून आहेत. दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १५० ते १८० असा दर आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका डाळिंब पिकाला बसला असला तरी, डाळिंबाचे दर टिकून राहिल्याने डाळिंब शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दर चांगले

गतवर्षी मृग बहरातील डाळिंबाचे दर कमी अधिक झाले होते. त्यामुळे काही अंशी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंब विक्रीचे नियोजन बाजारपेठेतील दरानुसार केले. गतवर्षीही परराज्यातील डाळिंबाच्या आवकेचा फटका राज्यातील डाळिंबाला बसला होता. परिणामी डाळिंबाचे दरही कमी झाले होते. वास्तविक पाहता, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या दरात १५ ते २० रुपयांनी दर चढे राहिले आहेत.

मृग बहारातील डाळिंबाची विक्री फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. यंदा डाळिंबाचे दर चांगले राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून डाळिंबाचे दर टिकून राहतील असा अंदाज आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT