Bajari Harvesting  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bajari Market : बाजरीची आवक खानदेशात स्थिर

Khandesh Bajari Rate : खानदेशातील बाजारांत बाजरीची आवक सध्या स्थिर आहे. मळणी या महिन्यातही सुरू राहिल्याने आवक टिकून आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील बाजारांत बाजरीची आवक सध्या स्थिर आहे. मळणी या महिन्यातही सुरू राहिल्याने आवक टिकून आहे. दर किमान १९०० व कमाल २३०० रुपये व सरासरी २२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

बाजरीसाठी खानदेशात चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार येथील बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांत बाजरीची आवक अजूनही टिकून आहे. सर्वाधिक आवक चाळीसगाव व अमळनेर येथील बाजारात होत आहे. चोपडा, शिरपुरातही आवक आहे. सध्या रोज सुमारे दोन हजार क्विंटल बाजरीची आवक प्रमुख बाजारांत होत आहे.

बाजरीचे उत्पादन यंदा कमी आहे. कारण वादळी पाऊस, गारपिट आदी समस्यांचा फटका पिकास बसला आहे. मळणी, कापणीसही उशीर झाला. कारण ६ मेनंतर अनेक दिवस पाऊस व वादळ अशी स्थिती होती. अनेकांनी या महिन्याच्या सुरुवातीला मळणी पूर्ण केली व लागलीच बाजरी बाजारात विक्रीसाठी आणली.

बाजरीची आवक एप्रिलमध्ये कमी होती. नंतर मेमध्ये आवक कमी झाली. मे अखेरीस आवकेत काहीशी वाढ झाली. परंतु आवक अधिकची नाही. कारण सर्वत्र बाजरी पीक नसल्याने आवकेचा दबाव नाही. यामुळे दर या हंगामात स्थिर आहेत.

चोपडा, शिरपूर बाजारात बाजरीस एप्रिलमध्ये कमाल २३५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. अजूनही कमाल दर २३०० रुपये प्रति क्विंटल, असा आहे. कमी दर्जाच्या बाजरीचे दर मात्र १९०० रुपयांपर्यंत आहेत. परंतु बाजरीस उठाव आहे. पुढे बाजरीची आवक कमी होईल. कारण अनेकांनी याच महिन्यात बाजरी विक्रीवर भर दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT