Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market Rate : चीन, ब्राझीलमुळे सोयाबीन मंदीत ? पुढचं भविष्य काय? सोयाबीन भावावर चीन, ब्राझील, अर्जेंटीनामधील घडामोडींचा परिणाम 

Market Update : सोयाबीन बाजाराचं लक्ष यापुढे आता तीन देशांकडे. हे देश म्हणजे ब्राझील, अर्जेंटीना आणि चीन. या देशांमधील घडामोडींचा सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम दिसून येत आहे.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीन बाजाराचं लक्ष यापुढे आता तीन देशांकडे. हे देश म्हणजे ब्राझील, अर्जेंटीना आणि चीन. या देशांमधील घडामोडींचा सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम दिसून येत आहे. हा परिणाम आपल्या देशातील सोयाबीन बाजारावरही दिसून येत आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये सोयाबीन काढणी, विक्री आणि वापर याविषयी घडामोडी घडत आहेत. 

चीन मार्च महिन्यात ६५ लाख टन सोयाबीन आयात करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनचे गाळप कमी होत आहे. गाळप मागील आठवड्यात जवळपास ७ टक्क्यांनी कमी झाले. तसेच चीनमधील काही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन गाळप बंद केले. त्यासाठी दोन कारण आहेत. एकतर या प्रक्रिया प्लांट्सना सोयाबीनची टंचाई जाणवत आहे किंवा मेंटनन्ससाठी गाळप बंद ठेवले जात आहे. 

सोयाबीनचे गाळप कमी होत असल्याने चीनमध्ये सोयापेंड आणि सोयातेलाचाही स्टाॅक कमी होत आहे. सोयापेंडचा स्टाॅक २३ टक्क्यांनी कमी झाला तर सोयातेलाचा स्टाॅक ३ टक्क्यांनी घटला. त्यातच पामतेलाच्या किमती वाढल्याने सोयातेलाचे भावही चीनमध्ये वाढले आहेत. हा भाव टिकून राहू शकतो, अशा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जगातील एक नंबरचा सोयाबीन उत्पादक ब्राझीलची सोयाबीन काढणीही जोमात सुरु आहे. आतापर्यंत ६९ टक्के काढणी पूर्ण झाली. पण काही भागात पाऊस झाल्याने काढणीत अडथळे येत आहेत. ब्राझीलच्या काही भागात सोयाबीनची उत्पादकता चांगली आली तर काही भागात उत्पादकता यंदा घटली. तसेच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज महिन्यागणिक कमी केले जात आहेत. 

अर्जेंटीनातही सोयाबीन काढणी सुरू झाली. अर्जेंटीनात आतापर्यंत ८ टक्के काढणी झाली. अर्जेंटीना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असला तरी ब्राझील आणि अमेरिकेपेक्षा सोयाबीनचे गाळप जास्त होते. त्यामुळे अर्जेंटीना सोयापेंड आणि सोयातेल उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे ब्राझीलबरोबरच अर्जेंटीनातील सोयाबीन बाजाराकडे सर्वाचं लक्ष असतं. 

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. तसेच सोयातेलाला पामतेलाचे भाव वाढल्याचा काहीसा फायदा होत आहे. पण सूर्यफूल तेलाचा पुरवठा आणि सोयातेलाचाही पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढ टिकत नाही. सोयापेंड एकापातळीभोवती फिरत आहे. सोयाबीन १२ डाॅलरच्या आसपास फिरत आहे. सोयाबीन बाजारावर यापुढच्या काळात ब्राझील, अर्जेंटीना आणि चीनमधील घडामोडींचा परिणाम होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Water Tourism: उजनी जलपर्यटनाचे भवितव्य अंधारात

Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त

Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Water Scheme Delayed: पाणी योजना चार वर्षांपासून रखडली

Summer Fruits Sale: चिंच-बोरांच्या विक्री हंगामाला सुरुवात

SCROLL FOR NEXT