Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी मुदतवाढीचा शेतकऱ्यांना लाभ नाहीच

Soybean Market : राज्यातील सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

Team Agrowon

Amravati News : राज्यातील सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र या वाढीव मुदतवाढीचा लाभ अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना झालाच नाही.

येथील खरेदी केंद्र २९ जानेवारीपासून बंद आहे, परिणामी शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरात पडून आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी असदपूर येथील माजी सरपंच ममता येऊतकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी ही खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत करण्याचे निर्देश होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री श्री. चौहान यांना फोन करत मुदतवाढ देण्याची मागणी केला होती. त्यानुसार त्यांच्या मागणीला यश आले होते. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार होता.

मात्र याचा लाभ अचलपूर तालुक्यासह परिसरातील सोयाबीन शेतकऱ्यांना झाला नसल्याचे दिसून आले. या ठिकाणचे खरेदी केंद्र मागील २९ जानेवारीपासून बंद आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदतवाढ दिल्यामुळे हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार होती.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र अचलपूर येथील खरेदी केंद्र मागील २९ जानेवारीपासून बंद आहे.

ज्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल सोयाबीन घरात पडून आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी असदपूर येथील माजी सरपंच ममता येऊतकर यांनी केली आहे.

शासनाने मुदत वाढ देऊन सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. जागा नसल्याचे कारण देत खरेदी बंद केली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात सोयाबीनला भाव नाही, शेतकरी यामुळे अडचणीत आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देऊन दिलासा द्यावा.
- ममता येऊतकर, माजी सरपंच, असदपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT