Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

India Soybean MSP Procurement: देशभरात सोयाबीनची ६.६५ लाख टन हमीभावाने खरेदी; महाराष्ट्र, मध्य प्रदेशात खरेदी खूपच कमी

Maharashtra Soyabean Market : नाफेडने देशभरात २३ डिसेंबरपर्यंत ६ लाख ६५ हजार टनांची खरेदी केली होती. सर्वाधिक ३ लाख ३६ हजार टन खरेदी मध्य प्रदेशात झाली.

Anil Jadhao 

Pune News : नाफेडने देशभरात २३ डिसेंबरपर्यंत ६ लाख ६५ हजार टनांची खरेदी केली होती. सर्वाधिक ३ लाख ३६ हजार टन खरेदी मध्य प्रदेशात झाली. तर तेलंगणात खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने पुन्हा २५ हजाराने वाढविण्यात आले. महाराष्ट्रात मात्र नाफेडने आतापर्यंत २ लाख ३ हजार टनांचीच खरेदी केली आहे.

तेलंगणात यापुर्वी ५९ हजार ५०८ टनांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. हे उद्दीष्ट तेलंगणा सरकारने मागील आठवड्यातच पूर्ण केले. उद्दीष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबविण्यात आली होती. पण शेतकऱ्यांनी खरेदी सुरु ठेवण्याची मागणी केली होती.

त्यामुळे तेलंगणा सरकारने केंद्राकडे पुन्हा २५ टन खरेदीची परवानगी मागितली होती. त्यानुसार तेलंगणा सरकारला परावनगी मिळाली आहे. तेलंगणा आता ८४ हजार ५०८ टन खरेदी करणार आहे. त्यापैकी तेलंगणात आतापर्यंत जवळपास ६९ हजार टनांची खरेदी देखील झाली.

मध्य प्रदेशात देशभरात आापर्यंत सर्वाधिक सोयाबीन खेरदी झाली आहे. मध्य प्रदेशात यंदा १३ लाख ६८ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ३६ हजार टन खरेदी पूर्ण झाली. मध्य प्रदेशात आतापर्यंत उद्दीष्टाच्या २५ टक्के खेरदी झाली. मध्य प्रदेशात ३१ डिसेंबरपर्यंत खरेदी चालणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात खेरदीचे उद्दीष्ट पूर्ण होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.

तेलंगणा वगळता इतर कोणत्याही राज्यात सोयाबीनची खरेदी उद्दीष्टाच्या ३० टक्केही झाली नाही. राजस्थानमध्ये नाफेडने २५ हजार ४६९ टनांची खरेदी करण्यात आली. गुजरातमध्ये २४ हजार २२४ टन खरेदी करण्यात आली. कर्नाटकातही ११ हजार ६५९ टनांच खरेदी २३ डिसेंबरपर्यंत करण्यात आली.

महाराष्ट्रात कमीच खरेदी

नाफेडने महाराष्ट्रात २ लाख ३ हजार टनांची खेरदी केली. राज्यात १२ जानेवारीपर्यंत खेरदी चालणार आहे. मात्र यंदा सरकारने १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट दिले होते. नाफेडची खरेदी केंद्रे जास्त आहेत. त्यामुळे खेरदीचे भीस्त नाफेडवरच होती. मात्र नाफेडचीच खरेदी धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे राज्यातही खेरदीचे उद्दीष्ट पूर्ण होणार नाही, हे जवळपास निश्चित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT