soybean rate
soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : देशात काही बाजारांत सोयाबीनचे दर स्थिर

टीम ॲग्रोवन

पुणे : देशातील सोयाबीन बाजारात (Soybean Market) शुक्रवारी (ता. ११) संमिश्र वातावरण राहीले. काही बाजारांत सोयाबीन दर (Soybean Rate) नरमले होते, तर काही ठिकाणी दर स्थिर होते. प्रक्रिया प्लांट्सचे दर कमी झाल्याचा परिणाम बाजारावर जाणवला. शुक्रवारी सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

बहुतेक शेतकरी सोयाबीनचा भाव सरासरी ६ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाण्याची वाट पाहत असल्याचे जाणवले. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता दर किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

टोमॅटो दर दबावात

बाजारात सध्या टोमॅटोचे दर दबावात आले आहेत. बदलत्या वातावरणात टोमॅटोला काहीसा कमी उठाव मिळत असल्याचे टोमॅटो व्यापाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे काही प्रमाणात आवकही वाढली. त्यामुळे दर कमी झाल्याचे सांगितले जाते. सध्या बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी १५०० रुपये ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. टोमॅटोचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

उडदाचे दर तेजीत

देशात सध्या उडदाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे नाफेड आयात उडदाची खरेदी करत आहे. परिणामी, उडदाच्या दराला आधार मिळतोय. सध्या खरिपातील उडदाला ६ हजार ४०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. तर आयात उडदाचे दरही ८ हजार १५० रुपयांपर्यंत आहेत. परिणामी उडदाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच असून दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

ज्वारी खातेय भाव

देशातील बाजारात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. खरिपात यंदा ज्वारीचे क्षेत्र काहीसे वाढले होते; मात्र पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे उत्पादन काहीसे कमी राहीले. तर दुसरीकडे रब्बीतील ज्वारी पेरणी आता सुरू झाली. बाजारात सध्या ज्वारीची आवकही कमी दिसतेय. त्यामुळे मालदांडी ज्वारीला सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. तर रब्बी ज्वारीला सरासरी ३ हजार ४ हजार २०० रुपये दर मिळतोय. ज्वारीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळण्याची शक्यता

देशातील बाजारात सध्या कापसाची आवक कमी आहे; मात्र उद्योगांकडून कापसाला उठाव मिळतोय. त्यामुळे कापसाचे दर मागील काही दिवसांपासून वाढलेले दिसत आहेत. शुक्रवारीही काही बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. पण सर्वसाधारणपणे विचार केल्यास दर स्थिर दिसत होते. शुक्रवारी बहुतांशी राज्यातील कापसाचा किमान दर ८ हजार रुपयांवर पोहोचला होता. तर कमाल दराने ९ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता.

सरकीच्या दरातही काही बाजारांमध्ये आज क्विंटलमागे सरासरी ५० रुपयांची सुधारणा झाली होती. सरकीचा किमान दर आता ३ हजार ७०० रुपयांवर पोहोचला. तर कमाल दराने ४ हजारांची पातळी गाठली. काही बाजारांमध्ये ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. पण सरासरी दर यापेक्षा कमी होता. शुक्रवारी महाराष्ट्रातील कापसाचा दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. तर गुजरातमध्येही सरासरी ८ हजार ते ९ हजार ३०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पंजाब, हरियाना, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात याच दरम्यान कापसाचे व्यवहार झाले. बाजारात सध्या कापसाचे दर वाढत आहेत; मात्र त्या प्रमाणात आवक वाढलेली दिसत नाही. पुढील काही दिवस शेतकऱ्यांना कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे बाजाराचा आढावा घेऊनच विक्री फायदेशीर ठरेल, असे आवाहन जाणकारांनी केलेय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT