Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीन दर स्थिरावला

Soybean Rate : बाजारपेठेत दरवाढ होईल, या अपेक्षेने अनेक दिवसांपासून थांबलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही.

 गोपाल हागे

Akola News : बाजारपेठेत दरवाढ होईल, या अपेक्षेने अनेक दिवसांपासून थांबलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. अकोला तसेच वाशीम या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीन सध्‍या साडेचार हजारांच्या आत विकते आहे.

दरवाढीची चिन्हे फारशी दिसत नसल्याने नाइलाजाने शेतकरी आता सोयाबीन विक्रीला काढत असून त्यामुळे आवकही वाढलेली दिसू लागली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची सुमारे तीन हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

दरांबाबत विचार केल्यास किमान चार हजारांपासून विक्री सुरू होत असून कमाल दर ४५०० च्या आतच मिळतो आहे. सरासरी ४४०० रुपयांचा दर असल्याचे सांगितले जाते.

वाशीममध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्री किमान ४३०० व कमाल ४५७५ दरम्यानच होत आहे. वाशीम हा बाजार सोयाबीनच्या दरासाठी व आवकेबाबत महत्त्वाचा आहे.

येथे अनेकदा उच्चांकी दरही मिळाले. या जिल्ह्यात दर्जेदार सोयाबीन उत्पादन घेतले जात असल्याने बियाणे कंपन्या तसेच खाद्यतेल बनवणारे घटक या ठिकाणावरून मोठी खरेदी करीत असतात. त्यामुळे या ठिकाणच्या दरांची चर्चा राहते. या बाजारातही सध्या दर कमीच मिळत आहेत.

दरवाढीची शक्यता नसल्याची भावना

अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या दृष्टीने सोयाबीन साठवून ठेवले आहे. परंतु आता दरवाढीची शक्यता दिसत नसल्याने या बाजारात विक्रीकडे कल दिसू लागला आहे. वाशीममध्ये साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT