Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Price: सोयाबीनचे दर एक हजाराने पडले; शेतकरी अडचणीत!

Soybean Market Update: शासकीय खरेदी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमरावती बाजारात सोयाबीनला सरासरी ३८२० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर सोयाबीनचे दर आणखी घसरू लागले आहेत. स्थानिक बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ३८२० रुपये दर मिळाले. घटत्या दराने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आगामी हंगामात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याचा अंदाज शेती अभ्यासकांनी वर्तविला आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन हे पहिले नगदी पीक आहे. कापसापाठोपाठ सोयाबीनची पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात सोयाबीनला प्रारंभीपासूनच पडते दर मिळाले आहेत. निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष ओढावू नये, यासाठी तत्कालीन युती सरकारने सोयाबीनची शासकीय खरेदीची घोषणा केली.

त्याप्रमाणे नोंदणी व नंतर खरेदी केली गेली. तथापि, राज्यासाठी निर्धारित उद्दिष्टांच्या पन्नास टक्केही सोयाबीन खरेदी होऊ शकली नाही. अमरावती जिल्ह्यातही हीच सरासरी राहिली आहे. शासकीय खरेदी केंद्रांचा शेतकऱ्यांना आधार होता. हमीदराने सोयाबीन विकली जाईल, अशी आशा होती. मात्र ती संपल्यानंतर खासगी बाजारात दर वाढतील, ही अपेक्षाही फोल ठरली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. येथील बाजार समितीत ४ हजार ११३ पोत्यांची आवक झाली. त्यास सरासरी ३८२० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भाव वाढतील, या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच साठवून ठेवला आहे. काहींनी बाजारात आणला. मात्र त्यास हमीदरापेक्षाही एक हजार ७२ रुपये कमी दर मिळाला. पडत्या दराने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून सरकारी धोरणाचे ते बळी ठरू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT