Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनच्या दरात घट

Soybean Rate : खानदेशात सोयाबीनची आवक वाढत असून, दरात मागील काही दिवसांत घट झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सोयाबीनची आवक वाढत असून, दरात मागील काही दिवसांत घट झाली आहे. सध्या किमान ३००१ ते ४५०० रुपये व सरासरी ४३०० प्रतिक्विंटलचा दर आहे. सोयाबीनची सर्वाधिक आवक जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जळगाव या बाजार समित्यांत होत आहे.

तसेच धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजारांतही आवक होत आहे. मागील आठवड्यात आवक कमी होती. परंतु सरत्या आठवड्यात आवक वाढली. मागील सात ते आठ दिवसांपूर्वी किमान ३५०० व कमाल ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. परंतु काही दिवसांतच दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगाव येथील बाजार समितीतही ३५०० वरून किमान दर ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असे खाली आले. तर कमाल दरही ४६०० रुपयांवरून हळूहळू ४५०० रुपयांवर आले आहेत. चोपडा येथील बाजार समितीत मागील पाच दिवसांत प्रतिदिन सरासरी १८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.

या बाजार समितीत शुक्रवारी (ता. ६) सोयाबीनला किमान ३००१ व कमाल ४४७२ व सरासरी ४३५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक २०० क्विंटल होती. जळगाव बाजार समितीतही प्रतिदिन सरासरी १५० क्विंटल एवढी सोयाबीनची आवक राहिली.

अमळनेरातही आवक प्रतिदिन सरासरी १८० क्विंटलवर नोंदविण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी जळगाव, चोपडा बाजार समितीमधील आवक प्रतिदिन सरासरी प्रत्येकी १००, १२० क्विंटल अशी होती.

रोज ९०० क्विंटल आवक

आवक पुढे आणखी वाढू शकते, असाही अंदाज आहे. कारण मागील काही दिवस कोरडे, सूर्यप्रकाशीत वातावरण आहे. यामुळे कापणी, मळणीचे काम वेगात सुरू आहे. हे काम पुढील १५ ते २० दिवस सुरूच राहील. १० दिवसांपूर्वी मळणीला सुरुवात झाली. खानदेशातील प्रमुख सहा बाजार समित्यांत मिळून सध्या रोज ९०० क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT