Soya Oil Rate
Soya Oil Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soya Oil Rate : सोयातेलाचे दर वाढण्याची शक्यता

टीम ॲग्रोवन

पुणेः मागील महिनाभरात पामतेलाचे दर (Palm Oil Rate) पाचवेळा वाढले. तर मागील आठवडाभरातच पामतेलाच्या दरात जवळपास २० टक्क्यांची सुधारणा झाली. पामतेल दरवाढीचा आधार सोयाबीन तेलालाही (Soya Oil Rate) मिळतो आहे. सोयातेलाचे दरही जवळपास १३ टक्क्यांनी वाढले. पुढील काळात पामतेलाचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळं सोयाबीन बाजारालाही (Soybean Market) आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जागतिक पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आणि मलेशियाचा वाटा ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या दोन्ही देशांमध्ये सर्वसाधारणपणे नोव्हेंबरपासून पामतेल उत्पादन कमी होत जातं. परंतु यंदा सलग तिसऱ्या वर्षी ला निना स्थितीमुळं उत्पादनात जास्त घट येण्याची शक्यता आहे. सध्याही दोन्ही देशांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय.

तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. या पावसानं मजुरांना पामची फळ काढणीत अडचणी येत आहेत. तसचं पामची काढणी केल्यानंतर मिल्सपर्यंत वाहतुक करणंही अवघड होतंय. त्यामुळं यंदा पामतेल उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

पामतेलाचे दर सोयाबीन तेलापेक्षा कमी आहेत. त्यातच निर्यातशुल्क काढल्यानं इंडोयनेशियातून मोठी निर्यात झाली. पामतेलासह इंडोनेशियाची बायोडिझेल निर्यातही वाढली. त्यामुळं इंडोनेशियातील पामतेलाचा साठा झपाट्यानं कमी होतोय.

इंडोनेशियातील पामतेलाचा साठा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ४० लाख टनांवर होता. मात्र त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यातील साठा ५९ लाख टनांवर होता. म्हणजेच एकाच महिन्यात साठ्यात १९ लाख टनांची घट झाली.

सध्या भारताला नोव्हेंबरच्या निर्यातीसाठी वाहतुक आणि विम्याचा खर्च वगळता ९७६ डाॅलर प्रतिटनानं पामतेल मिळतंय. तर जानेवारीचे दर १ हजार १० डाॅलरवर पोचले. पण इंडोनेशियाने निर्यातीवर शुल्क लावल्यास हाच दर १ हजार १०० डाॅलरपर्यंत वाढेल. मार्च महिन्यात पामतेलाचे दर २ हजार डाॅलरवर पोचल्यानंतर इंडोनेशियानं निर्यातशुल्क कमी केलं होतं. सध्या पामतेलाचे दर वाढले तरी सोयातेलाच्या तुलनेत अद्यापही ४०० डाॅलरनं स्वस्त आहेत.

युध्दामुळं युक्रेनमधून होणारी सूर्यफुल निर्यात पुन्हा एकदा अडचणीत आली. त्यामुळं पामतेलाला मागणी वाढली. इंडोनेशियात पामतेलाचं उत्पादन वाढल्यानंतरही दर तेजीत होते. म्हणून येथील सरकारनं पामतेल निर्यातशुल्क काढलं होतं. पण आता पामतेलाचा साठा घटतोय आणि उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं इंडोनेशिया डिसेंबरनंतर पुन्हा निर्यातशुल्क लावण्याची शक्यता आहे. असं झाल्यास पामतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे दराची स्थिती?

सध्या पामतेलाचे दर वाढल्यानंतर सोयाबीन तेलालाही आधार मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाचे दर जवळपास १३ टक्क्यांनी वाढले. देशातही जवळपास १० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली. भविष्यात पामतेलाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होतेय. तसचं सूर्यफुल तेलाची टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळं सोयाबी तेलाचे दरही वाढतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. असं झाल्यास मागीलवर्षीप्रमाणं सोयाबीनचेही दर वाढू शकतात. सध्या देशातील बाजारांमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर नवं सोयाबीन ४ हजार ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकलं जातंय. पुढील महिनाभरात सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT