Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soymeal Export : सोयापेंडची निर्यात १९ टक्क्यांनी घटली; देशात वापरही कमी झाला

Soybean Market : देशातून सोयापेंडची होणारी निर्यात चालू हंगामात की झाली आहे. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ५ महिन्यांच्या काळात देशातून ९ लाख ५० हजार टन सोयापेंड निर्यात झाली.

अनिल जाधव

Pune News : देशातून सोयापेंडची होणारी निर्यात चालू हंगामात की झाली आहे. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ५ महिन्यांच्या काळात देशातून ९ लाख ५० हजार टन सोयापेंड निर्यात झाली. मागील हंगामात याच काळात ११ लाख ७१ हजार टन निर्यात होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यात १९ टक्क्यांनी घटली आहे, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे.

सोपाने आपला चालू हंगामातील मार्च महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालात ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळातील बाजारातील सोयाबीनची आवक, गाळप आणि आयातीचा माहीती दिली. तसेच सोयापेंड निर्मिती, देशातील वापर आणि निर्यात याचीही माहिती दिली. चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारात सोयाबीनला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे आवक गेल्यावर्षीपेक्षा कमी आहे.

बाजारात सध्या किमती हमीभावाच्या खाली राहील्या. भावात घटही होत आहे. त्यामुळे सोयाबीनला गाळपासाठी कमी उठाव राहीला. या परिस्थितीचा बाजारावर दबाव येत गेला. देशातील बाजारात मागील ५ महिन्यांमध्ये ६६ लाख टनांची आवक झाली. मागील हंगामात याच काळातील आवक ७० लाख टन होती. बाजारात आवक झालेल्या ६६ लाख टनांपैकी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ५१ लाख ५० हजार टनांचे गाळप झाले, असेही सोपाने म्हटले आहे.

सोयाबीन गाळपातून जवळपास ४१ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली. सोयापेंड निर्मिती गेल्यावर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहे. मागील हंगामात याच काळात जवळपास ४५ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडला कमी उठाव असल्याने सोयापेंड निर्मितीही कमी आहे, असे सोपाने स्पष्ट केले.

सोयापेंडची मागणी

सोयापेंडची मागणी देशातही कमीच राहीली. देशात सोयापेंडचा मुख्य ग्राहक पशुखाद्य उद्योग आहे. मात्र पशुखाद्या उद्योगाची मागणी जवळपास ७ टक्क्यांनी घटली आहे. पशुखाद्य उद्योगाने २७ लाख ५० हजार टनांचा वापर केला. मागच्या हंगामात पहिल्या ५ महिन्यांत पशुखाद्यामध्ये झालेल्या वापराच्या तुलनेत यंदाचा वापर २ लाख टनाने कमी आहे. तर मानवी आहारासाठीही सोयापेंडचा वापर काहीसा कमी झाला. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ३ लाख ६५ हजार टन सोयापेंडचा वापर झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT