Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Crisis: नाफेडने केला सोयाबीनचा खेळ; नाफेडच्या विक्रीने बाजारात अनिश्चिततेचे वातावरण

NAFED Soybean Sale: नाफेडच्या सोयाबीन विक्रीने बाजारात मोठा गोंधळ निर्माण केला आहे. कमी दरात विक्री झाल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असून बाजारातील अनिश्चितता वाढली आहे.

Anil Jadhao 

Pune News: सोयाबीनचा भाव मंदीत असतानाच नाफडने सोयाबीनची विक्री सुरु केली. नाफेड खूपच कमी भावात सोयाबीन विकत आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव आणखी कमी होऊन अनिश्चित वातावरण तयार झाले. नाफेडने बाजाराचा खेळ बिघडवल्याने प्रक्रियादार आणि व्यापारी बाजारात स्पष्टता येण्याची वाट पाहत आहेत. तर कमी भावातही सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

सोयाबीनची काढणी सुरु होऊन आता ५ महीने झाले. हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. सरकारने यंदा सोयाबीनला सरासरी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. बाजार मात्र सुरुवातीपासून भाव ४ हजार ते ४ हजार २०० रुपये होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारला हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी प्रयत्न केला. मात्र अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही सोयाबीनची खरेदी झाली नाही. तसेच काही शेतकरी खुल्या बाजारात दरवाढीची वाट पाहत होते.

सरकारने नाफेड आणि एसीसीएफच्या माध्यमातून जवळपास २० लाख टनांची खरेदी केली. यामुळे बाजारात दर सुधारतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसे झाले नाही. उलट सरकारची खरेदी सुरु असतानाच भाव कमी होत गेले. सराकरने खेरदी बंद केल्यानंतर बाजार ४ हजारांच्या दरम्यान होता. हा भाव गेल्या एक महिन्यापासून बाजारात दिसत होता. पण सोयाबीन बाजारातील खेळ नाफेडच्या विक्रीमुळे बिघडला.

नाफेड खेरदी केलेले सोयाबीन खुल्या बाजारात विकेल, या बातमीमुळे आधीच बाजारातील सेंटीमेंट बिघडले होते. पण नाफेड काय भावात सोयाबीन विकते, याची वाट प्रक्रियादार आणि व्यापारी पाहत होते. नाफेड सोयाबीन विक्रीचा भाव ४ हजार ३०० रुपये ठेवले, अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात नाफेडने पहिल्या विक्रीत सोयाबीन जवळपास ४ हजार १५० रुपयाने विकले. पहिल्या विक्रीतील माल कमी असला तरी त्याचा सेंटीमेंट परिणाम बाजारावर मोठ्या प्रमाणात झाला. नाफेडने ज्या भावात सोयाबीन विकले त्याच भावाने प्रक्रिया प्लांट्सनीही सोयाबीनची खरेदी सुरु केली. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी ३ हजार ७०० ते ३ हजार ८०० रुपयाने सुरु झाली आहे.

संभ्रमाची परिस्थिती

नाफेडच्या विक्री धोरणामुळे बाजारात अनिश्चित वातावरण तयार झाले आहे. नाफेडच्या विक्रीमुळे बाजारातील भाव नेमके कसे राहतील? याची स्पष्टताच येत नाही. खरेदी केली आणि भाव कमी झाले तर तोटा होईल यामुळे प्रक्रियादार सध्या गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. तर व्यापारी खरेदीपासून दूर होताना दिसत आहेत. मात्र यामुळे कमी भावातही शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी खरेदीदार शोधावे लागत आहेत.

विक्रीचे धोरण जाहीर करा

नाफेडने अपेक्षेपेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री सुरु केली. त्यामुळे पुढच्या विक्रीत नाफेड काय भावाने सोयाबीन विकेल? या प्रश्नामुळे बाजारातील वातावरण बिघडले. नाफेड कमी भावात विक्री करणार हे सेंटीमेंट बाजारात तयार झाले. नाफेडने अशीच विक्री केली तर दर आणखी कमी होतील, यामुळे बाजारात खरेदीदार नाहीत. त्यामुळे सरकारने नाफेडच्या विक्रीचे धोरण स्पष्ट करून किती भावात सोयाबीनची विक्री करणार हे जाहीर करावे. यामुळे बाजारात एक स्पष्टता येईल आणि संभ्रम दूर होईल, असे अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Pending Water Charges: ताकारीचे पाणी पाहिजे, आधी थकीत पाणीपट्टी भरा

MPSC Paper Leak : ‘एमपीएससी’ पेपरफुटीची सखोल चौकशी करा

Farmer Demands: मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

Land Revenue Code: भडगाव तहसीलदारांचा पाय खोलात

SCROLL FOR NEXT