Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : किसान तू रहेगा मौन, तो तेरी सुनेगा कौन

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘किसान तू रहेगा मौन, तो तेरी सुनेगा कौन,’’ अशा टॅगलाइनचा वापर करीत मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडियावर मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जिल्ह्यातूनच या मोहिमेची सुरुवात झाली आहे.

देशात कापसाची सुमारे १३० लाख हेक्‍टरवर, तर ११८ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. त्यामुळेच देशांतर्गत सोयाबीन हे दुसरे मुख्य पीक आहे. मात्र खाद्यतेलाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने खाद्यतेलाच्या आयातीवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकावे लागत आहे.

२०२३-२४ या वर्षात सोयाबीनचा हमीभाव ४,६०० रुपये होता. गेल्या वर्षी ३५०० ते ४००० रुपये याच दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. क्‍विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. २०२४-२५ करिता शासनाने ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला असून, मध्य प्रदेशातील बाजारात नवे सोयाबीन येण्यास अवघा २५ ते ३० दिवसांचा कालावधी उरला आहे.

त्याचवेळी केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीचा सपाटा लावल्याने सोयाबीनचे दर दबावात राहतील, अशी भीती आहे. ३५०० ते ३८०० असाच दर केंद्राच्या धोरणामुळे सोयाबीनला मिळेल की काय, अशी स्थिती बाजारात आहे. त्याच कारणामुळे मध्य प्रदेशात सोशल मीडियावर सरकारविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे.

‘सत्ता की फसल खतरे मे’

२० पैकी २९ जागा जिंकून देणारा मध्य प्रदेश सोयाबीनचा सर्वांत मोठे उत्पादक राज्य आहे. जर सोयाबीनला योग्य दर नाही मिळाला तर भविष्यात तुमच्या सत्तेचे ‘पीक’ धोक्यात आहे. ! जय जवान जय किसान !

६० रुपये लिटर पेट्रोल १०८ रुपये झाले. ४५ रुपयांचे डिझेल ९५ रुपये झाले. आणि १५० रुपयांचे मोबाईल रिचार्ज ३०० चे झाले. आणि पाहता पाहता सोयाबीन ५५०० चा दर ३८०० वर आला. ‘किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन’, असा प्रश्‍न मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘मैं किसान हूं मेरा सोयाबीन ६००० रुपये बिकना चाहिए !’ अशीही मागणी केली जात आहे.

...असे आहे लागवड क्षेत्र (लाख-हेक्‍टर)

मध्य प्रदेश ः ५२.०५०

महाराष्ट्र ः ४५.६४०

राजस्थान ः १०.९४५

कर्नाटक ः ४.०७७

गुजरात ः २.६६३

तेलंगणा ः १.७९८

अन्य ः १.०२०

एकूण ः ११८.५४७

सोयाबीनचा एकरी उत्पादकता खर्च १० हजार रुपये आहे, तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीने व्यवहार होत आहेत. कीड-रोगामुळे उत्पादकता अवघी ४ ते ५ क्‍विंटलवर स्थिरावली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या धोरणामुळे यंदा ते आणखी दबावात राहतील, अशी भीती आहे. त्यामुळे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या गृह जिल्ह्यात विरोधाची मोहीम सुरू आहे.
- शेतकरी, मोहाडिया, ता. जि. सिहोर, मध्य प्रदेश

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT