Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : अमरावती बाजार समितीत सोयाबीन आवक वाढली

Soybean Arrival : पावसातील खंड त्यानंतर अतिवृष्टी व इतर कारणांमुळे उत्पादकता प्रभावीत झाली असतनाही सोयबीनचे दर मात्र हंगामभर दबावात राहिले.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : पावसातील खंड त्यानंतर अतिवृष्टी व इतर कारणांमुळे उत्पादकता प्रभावीत झाली असतनाही सोयबीनचे दर मात्र हंगामभर दबावात राहिले. ४६०० रुपयांचा हमीभावही सोयाबीनला मिळाला नाही. यापुढील काळातही तेजीची शक्‍यता नसल्याने शेतकरी साठविलेले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढू लागले आहेत.

केंद्र सरकारने सोयाबीनल ४६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून हमीभावापेक्षा कमी दरानेच सोयाबीनची खरेदी होत आहे. ३ फेब्रुवारीला ४२५० ते ४३२६, सहा फेब्रुवारीला ४२५० ते ४३७१, ७ फेब्रुवारीला ४३०० ते ४३७५, ९ फेब्रुवारीला ४३०० ते ४०००, १२ फेब्रुवारीला ४४०० ते ४४७२ आणि १७ फेब्रुवारीला ४२०० ते ४३२६ असा दर सोयाबीनला मिळाला.

आता ४२५० ते ४३२६ या दराने सोयाबीनचे व्यवहार होत असल्याचे अमरावती बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात देखील बाजारात सुधारणा होण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांकडून नाईलाजाने साठविलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिला जात आहे.

त्याच्याच परिणामी बाजारातील आवक वाढती असल्याचे चित्र आहे. अमरातवी बाजार समितीत (Amravati Bazar Samiti) रोज सरासरी साडेपाच हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची सोयाबीन आवक होत आहे. सोयापेंडचा दर ३१०० ते ४००० रुपये क्‍विंटल आहे. शासनाने तेलावरील आयातशुल्क कमी केल्याने तेलाचे दरही नियंत्रणात आहेत.

या साऱ्याच्या परिणामी सोयाबीनचे दर (Soybean Rate) दबावात असल्याचे सांगितले जाते. दरात सुधारणा झाली तरी ती १०० ते २०० रुपये या प्रमाणात राहणार असल्याचेही बाजार समितीतील व्यापारी सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT