Cotton Rate
Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market: कापूस निर्यात सुरळीत; सुतगिरण्याही फायद्यात : अतुल गणात्रा

Anil Jadhao 

पुणेः कापूस दर वाढीला पोषक घडामोडी सध्या बाजारात घडत आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला.

तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी युएसडीएच्या या अंदाजाला दुजोरा देत  उद्योगांची कापसाची मागणी वाढली असून सुतगिण्या फायद्यात असल्याचे सांगितले.

तर निर्यातही वेगाने सुरु असल्याचं स्पष्ट केलं. यामुळे देशातील कापूस दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

जागतिक पातळीवर कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. युएसडीएनं भारतातील कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट केलं. युएसडीएनं फेब्रुवारीचा अहवाल प्रसिध्द केला.

भारतातील कापूस उत्पादन ३२६ लाख गाठींवर स्थिरावेल, असा सुधारित अंदाज युएसडीएनं व्यक्त केला. युएसडीएचा जानेवारीतील अंदाज ३३९ लाख गाठींचा होता.

म्हणजेच एका महिन्यातच उत्पादनाच्या अंदाजात १३ लाख गाठींची कपात करण्यात आली. भारतातील कापूस घटीमुळं आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो.

युएसडीच्या या अंदजाविषयी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, युएसडीएचा हा अंदाज खरा असू शकतो.

सीएआयचा अंदाज ३३० लाख गाठींचा आहे. पण पुढील बैठकीत यात कपातही होऊ शकते. सध्या देशातील उद्योगांकडून कापसाला चांगली मागणी आहे, असंही गणात्रा यांनी सांगितलं.

भाराताचा कापूस स्वस्तच
देशातील उद्योग आणि निर्यातीसाठी सध्या कापसाला चांगली मागणी आहे. देशातील सुतगिरण्यांसाठी सध्या चांगली वेळ आहे, असेही गणात्रा यांनी स्पष्ट केले.

तसेच सध्या भारतातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय दरापेक्षा स्वस्त आहेत. भारताचा कापूस ६१ हजार ५०० ते ६२ हजार रुपये प्रतिखंडी आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आयात करायचा म्हटल्यास ६५ हजाराने मिळेल.

आयातशुल्कासह एक खंडी कापूस ७० हजार रुपये पडेल. त्यामुळे देशातील सध्याचे दर परवडणारे आहेत, असेही गाणात्रा यांनी स्पष्ट केले. 

देशातील दरपातळी
आजही देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच होते. कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ८०० ते ८  हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होते. तर कापसाची बाजारातील आवक आज स्थिर होती.

दरवाढीची शक्यता
देशात सध्या कापूस बाजारभाव दबावात असले तरी, उद्योगांकडून कापसाला मागणी वाढली. निर्यातही सुरु झाली. त्यातच देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी करण्यात आला. कापसाचे वायदेही सुरु होत आहेत.

एकूणच काय तर देशात कापूस दर सुधारण्यात परिस्थिती पुरक आहे. कापसाच्या भावात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा होऊ शकते. कापसाचा भाव या हंगामात ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

प्रतिक्रिया
सध्या देशातील सूतगिरण्या ८५ ते ९० टक्के क्षमतेने सुरु आहेत. देशातील सुतगिरण्यांना सध्या तोटा होतन नाही.

गुजरातसह महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमधील सुतगिरण्या एक किलो सुतामागे १० रुपयांचा नफाही होत आहे. तसेच बांगलादेश आणि शेजारच्या देशांकडून कापूस निर्यासाठी मागणीही चांगली आहे.

भारतातून रोज ५ ते १० हजार गाठी कापसाची निर्यात होत आहे. तसेच सध्या भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा खंडीमागे एक हजार रुपयाने स्वस्त आहे.
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT