Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Maize Rate : बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे. तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला. त्यामुळे मक्याच्या भावात मागील ८ दिवसांच्या काहिशी सुधारणा दिसून येत आहे.

अनिल जाधव

सोयाबीन दबावातच

सोयाबीन बाजारभाव सध्या दबावातच आहेत. सोयाबीनला आजही हमीभावापेक्षा किमान ८०० रुपये कमी भाव मिळत आहे. कारण राज्यात आज सोयाबीनचा सरासरी बाजारभाव ४ हजार १०० रुपये होता. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.

एनसीडीईएक्सच्या खेरदी केंद्रांवरही सोयाबीन आज ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे दबावातच आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात नरमाई

कापसाचे भाव दबावातच आहेत. दुसरीकडे बाजारातील आवक दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुकीनंतर बाजारातील आवक वाढल्याचे दिसत आहे. मात्र भावपातळी कमीच आहे. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर वायद्यांमध्ये जानेवारीच्या सौद्यांमध्ये कापसाला ५६ हजार १०० रुपये प्रतिखंडीचा भाव मिळाला. बाजारातील कापसाची आवक यापुढच्या काळात चढी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापूस बाजारातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

मक्याच्या दरात काहिशी सुधारणा

बाजारातील मक्याची आवक स्थिरावली आहे. तर दुसरीकडे मक्यामधील ओलावा कमी झाला. त्यामुळे मक्याच्या भावात मागील ८ दिवसांच्या काहिशी सुधारणा दिसून येत आहे. मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या २ हजार १०० ते २ हजार २०० रुपये दिसून येत आहे.

मात्र ओलावा अधिक असलेल्या मालाला आजही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे किमान भावपातळी आजही १८०० रुपये दिसत आहे. यापुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे मक्याचे बाजारभाव टिकून राहतील, असा अंदाज मका बाजारतील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तिळाचे भाव स्थिर

तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

हरभरा दरात नरमाई

देशातील बाजारात हरभरा दरात नरमाई दिसून आली. हरभरा भाव उच्चांकी दरावरून अपेक्षेपेक्षा कमी झाले, असे व्यापारी सांगत आहेत. हरभरा भावावर पिवळा वाटाणा आयातीचा परिणाम होत आहे. पिवळा वाटाणा स्वस्त असल्याने हरभरा भावही कमी होण्याला मदत झाली. देशातील बाजारात हरभरा भाव सध्या ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. हरभरा भावात पुढील काळात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असे हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT