Sesame Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sesame Market : तिळाचे दर १६ हजार रुपयांवर

Sesame Market Rate : तिळाचा हंगाम संपला असतानाही दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तिळाची साठवणूक केली होती.

Team Agrowon

Nagpur News : तिळाचा हंगाम संपला असतानाही दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तिळाची साठवणूक केली होती. या शेतकऱ्यांकडून बाजारात तीळ आणला जात आहे. मात्र आवक कमी असल्याने दरात चांगलीच सुधारणा झाली आहे. १३५०० ते १४००० रुपयांवरून तिळाचे दर १६००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

यवतमाळ, कारंजा (जि. वाशीम) तसेच अमरावती अशा विदर्भातील काही निवडक बाजार समित्यांमध्येच तिळाची आवक होते. सध्या कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत आवक होणाऱ्या तिळाच्या दरात चांगलीच सुधारणा दिसून येत आहे. १६००० ते १६००५ याप्रमाणे तिळाचे व्यवहार होत असून आवक जेमतेम ७ क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.

कारंजासोबतच यवतमाळ बाजार समितीतदेखील तिळाचे दर तेजीत असून या ठिकाणी १५,९०० असा दर मिळत आहे. गेल्या पंधरवाड्यात या तिनही ठिकाणी १४ हजार रुपयांपर्यंत तिळाचे दर होते.

हंगाम संपल्याने आणि मोजक्‍याच शेतकऱ्यांकडे तीळ असल्याने कमी आवकेच्या परिणामी दरात सुधारणा झाल्याचे सांगितले जाते.

अमरावती बाजार समितीतदेखील तिळाची अल्प आवक असून या ठिकाणीदेखील १५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने तिळाचे व्यवहार होत आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्‍यात सुमारे दोन हजार हेक्‍टरवर तिळाची लागवड होते.

गेल्या काही वर्षांपासून या तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी भुईमुगावरील किड-रोगाच्या परिणामी उत्पादकता कमी झाल्याने तिळाचा पर्याय निवडला आहे. त्याच कारणामुळे नजीकच्या काळात यवतमाळ जिल्हा तीळ उत्पादकतेचा हब ठरला आहे.

बुलडाण्यात ओव्याला १६५०० रुपये दर

बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव बाजार समितीत ओव्याचे (अजवान) व्यवहार १६५०० रुपयांनी होत आहेत. विदर्भातील या एकमेव बाजारात ओव्याची आवक होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT