Soybean Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ४८२० रुपये दर

Soybean Rate in Hingoli : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मंगळवारी (ता. २८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होती.

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) मंगळवारी (ता. २८) सोयाबीनची १००० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४६१० ते कमाल ५०३० रुपये तर सरासरी ४८२० रुपये दर मिळाले.

हिंगोली धान्य बाजारातील सोयाबीनच्या आवकेत थोडी घट झाली आहे. किमान व कमाल दर १५० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. मंगळवार (ता. २१) ते मंगळवार (ता. २८) या आठवड्याच्या कालावधीत सोयाबीनची १० हजार ९३५ क्विंटल आवक होऊन सरासरी ४८२० ते ५०२५ रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. २५) सोयाबीनची १८२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४७८० ते कमाल ५११९ रुपये तर सरासरी ४९४९ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २४) सोयाबीनची २०२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५१३६ रुपये तर ४९६८ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २३) २००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८०५ ते कमाल ५१३९ रुपये तर सरासरी ४९७२ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २२) १९०० क्विंटल आवक होऊन सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४८१५ ते कमाल ५२३० रुपये तर सरासरी ५०२२ रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. २१) सोयाबीनची २१९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ५२०० रुपये तर सरासरी ५०२५ रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT