Cashew Nut Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashew Rate : काजूला प्रतिकिलो दोन रुपये अधिक दर

सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघ गेल्या दोन-तीन वर्षांपासून काजू बी खरेदी करते. व्यापाऱ्यापेक्षा अधिक दर देऊन ही बी खरेदी केली जाते.

Team Agrowon

Cashew Nut Rate सिंधुदुर्गनगरी ः उत्पादनखर्चाइतका देखील काजू बीला दर मिळत नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये (Cashew Producer) नाराजी आहे. त्यामुळे काजू बागायतदारांना काहीसा दिलासा द्यावा, या हेतुने सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघाने काजू बी ला बाजारपेठेत (Cashew Market) असलेल्या दरापेक्षा अधिक दोन रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघ गेल्या दोन-तीन वर्षांपासून काजू बी खरेदी करते. व्यापाऱ्यापेक्षा अधिक दर देऊन ही बी खरेदी केली जाते. जिल्ह्यात सध्या काजू हंगाम सुरू झालेला आहे.

काजू बी सध्या १२०, १२५, १३० असा प्रतिकिलो दर आहे. परंतु प्रत्यक्षात उत्पादकाला प्रतिकिलो १२२ रुपये खर्च येतो. त्यामुळे बागायतदाराला प्रतिकिलो १४० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा असते. परंतु तरीदेखील काजू बागायतदारांना अपेक्षित दर मिळत नाही.

दरम्यान, दोन-तीन वर्षांपासून बागायतदार संघ शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काजू बी खरेदी करतो. गेल्यावर्षी व्यापाऱ्यापेक्षा चांगला दर बागायतदार संघाने दिला होता. त्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील दरामध्ये वाढ केली होती.

त्यामुळे यावर्षी देखील काजू बी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, विठ्ठल मोरूडकर, जर्नादन नाईक यांनी काजू बी खरेदीचा निर्णय जाहीर केला.

‘उत्पादकाला दर देताना हात आखडता’

‘‘व्यापारी आणि कारखानदार मिळून काजू बी चा दर ठरवितात. तो काजू उत्पादकांना परवडतो का? याचा विचार केला जात नाही. त्यामुळे बागायतदारांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.

गोव्यात गावठी काजू बी ला २०० रुपयांपर्यंत दर मिळतो. परंतु सिंधुदुर्गात ही स्थिती नाही. एकीकडे जिल्ह्यातील ‘जीआय’ काजुगराला दोन ते तीन हजार रुपये दर परदेशात मिळतो. परंतु शेतकऱ्याला दर देताना मात्र व्यापारी हात आखडता घेतात,’’ असा आरोप सावंत यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT