Cotton Industry Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Ginning Pressing Industry: खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड वाढली

Cotton Industry: खानदेशात यंदा कापूस गाठींचे किंवा रुईचे उत्पादन कापसाप्रमाणेच कमी होणार आहे. परंतु मध्यंतरी रखडत सुरू असलेला कापसापासून रूई तयार करणारा जिनिंग प्रेसिंग उद्योग आता गतीने कार्यरत सुरू झाला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात यंदा कापूस गाठींचे किंवा रुईचे उत्पादन कापसाप्रमाणेच कमी होणार आहे. परंतु मध्यंतरी रखडत सुरू असलेला कापसापासून रूई तयार करणारा जिनिंग प्रेसिंग उद्योग आता गतीने कार्यरत सुरू झाला आहे.

कापूस महामंडळाकडूनही (सीसीआय) कापूस खरेदीला गती आली आहे. परिणामी, बाजारात स्पर्धा असून, खासगी कारखानदार किंवा खरेदीदारांनीदेखील कापूस खरेदीस गती दिली. खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखाने दिवाळीनंतर सुरू होतात. लागलीच या कारखान्यांच्या कामास गती येते.

परंतु यंदा कापूस बाजारातील अस्थिरता, कमी कापूस आवक, वित्तीय समस्यांमुळे जिनिंग प्रेसिंग कारखाने गतीने कार्यरत नव्हते. एका कारखान्यात रोज किमान ७० ते ८० कापूसगाठी (एक गाठ १७० किलो रुई) तयार होते. खानदेशात सुमारे ११२ जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. यातील ७५ ते ८० कारखाने दरवर्षी गतीने सुरू होतात. दरवर्षी २२ ते २५ लाख कापूस गाठींचे उत्पादन खानदेशात केले जाते.

परंतु यंदा कापूस उत्पादनात घट आली. ऑक्टोबरमधील पावसाने कापसातील ओलावा ही मोठी समस्या होती. तसेच बाजार अस्थिर असल्याने अनेक कारखानदार सावध भूमिकेत होते. कापूसदर दबावात होते. सरकी दरातही डिसेंबरमध्ये घसरण झाली. यानंतर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली. यामुळे स्पर्धा वाढली आणि खासगी कारखानदारांनी देखील कापूस खरेदीस खेडा खरेदीच्या माध्यमातून वेग दिला. कापूस दरात किरकोळ सुधारणादेखील झाली.

सध्या खानदेशात सुमारे ७५ जिनिंग प्रेसिंग कारखाने गतीने सुरू आहेत. एका कारखान्यास रोज ३०० ते ३५० क्विंटल कापसाची गरज भासत आहे. मजूरदेखील उपलब्ध आहेत. उष्णता वाढलेली नाही. पुढे उष्णता वाढल्यास कामकाजावर परिणाम होतो. तसेच सणासुदीचे दिवसही सध्या नाहीत.

यामुळे जिनिंग प्रेसिंग उद्योगाची चाके गतीने फिरत आहेत. खानदेशातील काही जिनिंग प्रेसिंग कारखानदार मराठवाडा, विदर्भातही कापसाची खरेदी करीत आहेत. कमाल कारखाने सध्या पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. यामुळे यंदा एप्रिलअखेरीस जिनींग प्रेसिंग कारखान्यांमधील कामकाज बऱ्यापैकी पूर्ण होईल, असे दिसत आहे. रुईसही उठाव आहे. सूतगिरण्या रुईची मागणी नोंदवू लागल्या आहेत. खानदेश व लगत काही सूतगिरण्या गतीने सुरू झाल्या आहेत. तेथे रुईची पाठवणूक सुरू आहे.

उत्पादन कमी राहणार

खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखाने २२ ते २५ लाख कापूस गाठींचे उत्पादन करतात. परंतु यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच सीसीआयने देखील कापसाची मोठी खरेदी खानदेशात केली आहे. यामुळे खानदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यांतील उत्पादन १८ ते २० लाख कापूसगाठी एवढे येईल, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT