Cotton Procurement  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : कापूस खरेदीचे अधिकार खासगी बाजार समित्यांनाही द्यावेत

Cotton Market : शेतकरीहितासाठी शासकीय खासगी बाजार फेडरेशन कार्यरत आहे. राज्यात ९१ खासगी बाजार समित्या आहेत. पैकी ८३ बाजार समित्या प्रत्यक्षात कार्यरत आहेत.

Team Agrowon

Dhule News : ‘सीसीआय’सह सहकारी बाजार समित्यांप्रमाणे कापसाच्या खरेदीचे अधिकार शासनमान्य खासगी बाजार समित्यांनाही द्यावेत, अशी एकमुखी मागणी शासनमान्य खासगी बाजार फेडरेशनच्या राज्यस्तरीय बैठकीत झाल्याची माहिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भामरे यांनी दिली.\

शेतकरीहितासाठी शासकीय खासगी बाजार फेडरेशन कार्यरत आहे. राज्यात ९१ खासगी बाजार समित्या आहेत. पैकी ८३ बाजार समित्या प्रत्यक्षात कार्यरत आहेत. राज्यातील खासगी बाजार फेडरेशनच्या सदस्य असलेल्या समित्यांची छत्रपती संभाजीनगरात नुकतीच बैठक झाली. फेडरेशनचे अध्यक्ष भामरे अध्यक्षस्थानी होते.

राज्यातील ६३ बाजार समित्यांच्या संचालकांनी मते मांडली. नितीन अग्रवाल (पाचोरा), अरविंद जैन (बोदवड), निखिल अग्रवाल (अकोला), गोपाल हेडा, अशोक अग्रवाल (चिखली), फेडरेशनचे सचिव सुमित चौधरी, खजिनदार विजय बियाणे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

फेडरेशनचे अध्यक्ष भामरे म्हणाले, की भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्या कापसाची खरेदी करतात. त्याप्रमाणे शासनमान्य खासगी बाजार समित्यांना (फेडरेशन) कापसाच्या खरेदीस परवानगी द्यावी. त्यासाठी सहकारी बाजार समिती एका रुपयाचा सेस लावते.

त्याऐवजी फेडरेशनच्या सदस्य असलेल्या समित्या केवळ ५० पैसे सेस लावतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या ५० पैशांची रोज बचत होईल. यासह नाफेडची खरेदीही फेडरेशनमार्फत झाल्यास हमाली आणि दलालीसाठी होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचू शकेल. तसा खर्च वाचत आहे. फेडरेशनच्या सदस्य समित्यांकडून खरेदीचे रोख पैसे शेतकऱ्यांना मिळतात. २००९ ला असलेल्या राज्य सरकारने हा कायदा स्वीकारला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT