Tur Crop Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Production : आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Pigeon Pea MSP : तूर उत्पादकांना शासनाच्या किमान हमी दरानुसार खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी पेऱ्याची अडचण येत होती. या बाबत राज्याच्या पणन विभागाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : तूर उत्पादकांना शासनाच्या किमान हमी दरानुसार खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी पेऱ्याची अडचण येत होती. या बाबत राज्याच्या पणन विभागाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे.

सोयाबीन, उडीद, मूग या पिकासोबत तुरीचा पेरा नोंदलेल्यांना या पिकाचे संपूर्ण क्षेत्र तर कपाशी सोबत तुरीचा पेरा नोंदलेल्यांना या पिकाच्या अर्धे क्षेत्र तूर नोंदणीसाठी ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार शेतकऱ्यांना शासनाच्या केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी सातबारावर तुरीचा ऑनलाइन पेरा नोंदणे आवश्यक आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर तुरीची नोंद नसल्यामुळे हजारो शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या बाबत ‘ॲग्रोवन’ने ‘पेरा नोंदणी अभावी शासकीय तूर खरेदी रखडली’ या मथळ्याखाली बातमी दोन मार्च रोजी प्रकाशित केली होती.

या बाबत राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव संगीता शेळके यांनी बुधवारी (ता. ५) परिपत्रक जारी केले आहे. यात हंगाम २०२४-२०२५ मधील हमी दराने तूर खरेदी संदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक, ‘नाफेड’चे राज्य प्रमुख, एनसीसीएफचे शाखा प्रमुख तसेच एनईएमएलच्या व्यवस्थापकांना त्यांना तुरीच्या पेरा संदर्भात सूचना केली आहे.

तुरीचे पीक आंतरपीक म्हणून घेण्यात येते. सध्या सुरू असलेल्या तूर खरेदीसाठी मूग, उडीद व सोयाबीन पिकासोबत आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीच्या लागवडीखालील संपूर्ण क्षेत्र (शंभर टक्के) आणि कापूस पिकांसोबत तुरीचे आंतरपीक घेतले असल्यास कापूस व तुरीसाठी अर्धे-अर्धे (५०:५०) टक्के क्षेत्र ग्राह्य धरुन उत्पादकता निश्‍चित करावी व त्याप्रमाणे खरेदी करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामुळे सोयाबीन, मुग, उडीद या पिकासोबत तुरीचा पेरा नोंदविलेल्या शेतकऱ्यांना तुरीचा संपूर्ण क्षेत्राचा पेरा ग्राह्य धरुन विक्रीपूर्व नोंदणी करता येईल. तर कपाशीसोबत तुरीचा पेरा लावलेल्या शेतकऱ्यांना कपाशीच्या क्षेत्राच्या तुलनेत अर्धे क्षेत्र ग्राह्य धरुन पेरा नोंदविता येणार आहे.

शासनाच्या नव्या पत्रानुसार तूर उत्पादकांनी सोयाबीन, मुग, उडीद या पिकासोबत तुरीचा पेरा नोंदविला असेल तर या संपूर्ण क्षेत्रात तुरीचा पेरा ग्राह्य धरुन विक्रीपूर्व नोंदणी करता येईल. तर कपाशीसोबत तुरीचा पेरा लावलेल्यांना कपाशीच्या क्षेत्राच्या अर्धे क्षेत्र ग्राह्य धरुन पेरा नोंदविता येईल.
- राजेश हेमके, जिल्हा पणन अधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT