DAP Fertilizer Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

DAP Fertilizer Prices : डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत; शेतकऱ्यांना दिलासा

Farmer Relief : नव्या वर्षात डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची ५० किलोची बॅग १ हजार ३५० रुपयांना मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News : नव्या वर्षात डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची ५० किलोची बॅग १ हजार ३५० रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

देशात वर्षाला किमान १०५ ते ११० लाख टन डीएपीचा वापर होतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने डीएपी महाग होत आहे. कारण हा कच्चा माल कंपन्यांना आयात करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय खत बाजारात डीएपीच्या किमती गेल्या काही महिन्यांपासून भडकल्या आहेत. त्याचा परिणाम देशातील दरावरही होत आहे. पण देशात खतांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण आहे. खत कंपन्या मागील काही महिन्यांपासून डीएपीचे दर वाढविण्याची मागणी करत होत्या. केंद्रानेही नुकतेच दरवाढीला परवानगी दिली होती.

केंद्र सरकारने डीएपीचे दर वाढविण्याला परवानगी दिली. मात्र खतांवरील अनुदानाचा फेरविचार केला नव्हता. त्यामुळे देशात १ जानेवारीपासून डीएपीचे भाव वाढतील, अशी परिस्थिती होती. डीएपीच्या एका बॅगचा भाव १ हजार ३५० रुपये होता. पण भाव वाढून १ हजार ५५० रुपये होईल, अशी भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. पण केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहण्याला मदत होणार आहे. म्हणजेच डीएपीच्या भावात वाढ होणार नाही.

यापूर्वीही कॅबिनेटने जुलै २०२४ मध्ये प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांचे एकरकमी विशेष पॅकेज एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ साठी दिले होते. त्यासाठी अंदाजे २ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची शक्यता आहे.

अनुदान वाढवले

शेतकऱ्यांना डीएपीची ५० किलोची बॅग १३५० रुपयांनाच मिळावी यासाठी सरकारने प्रतिबॅग १७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेटने बुधवारी (ता. १) १ जानेवारीपासून डीएपीसाठी प्रतिटन ३ हजार ५०० रुपये विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ३ हजार ८५० कोटी रुपयांचे एकरकमी विशेष पॅकेज देण्यात येणार आहे. हे अनुदान पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे.

कारवाई करणार...

शेतकऱ्यांवर खतांच्या दरवाढीचा बोजा पडू नये यासाठी सरकारने खतांचे अनुदान वाढवले आहे. शेतकऱ्यांकडून एका बॅगसाठी १ हजार ३५० रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT