Turmeric Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Arrival : रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक

Turmeric Market : येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ८) हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला. हळदीची सुमारे १५ हजार क्विंटलची आवक झाली होती.

Team Agrowon

Washim News : येथील बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ८) हळदीची विक्रमी आवक झाली असून हळदीला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला. हळदीची सुमारे १५ हजार क्विंटलची आवक झाली होती.

हमखास उत्पादन देणारे तसेच नगदी पीक म्हणून हळदीची या भागात ओळख निर्माण आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून तालुक्यात हळदीच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे.

मागील काही वर्षांपासून सिंचनाच्या सुविधेत वाढ झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे हळद लागवड केली जाते. गेल्या दोन महिन्यांत ढगाळ वातावरण व पावसामुळे हळद काढणी व प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला.

हळद तयार होताच खरीप हंगामासाठी तजविज म्हणून शेतकरी हळदीची विक्री करीत आहेत. यामुळे बाजारात आवक प्रचंड वाढली आहे. येथील बाजारात १५ हजार क्विंटलपर्यंत आवक झाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली. येथील बाजार समितीत आठवड्यातून फक्त गुरुवारी हळदीचे सौदे केले जातात.

या बाजारात लोणार, मेहकर, मालेगाव व मराठवाड्यामधून हळद विक्रीला येत असल्यामुळे बाजार समितीमध्ये एकच गर्दी होत झाल्याचे गुरुवारी (ता. ८) दिसून आले. बाजार समितीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, चांगल्या प्रतिच्या हळद कांडीला साडेसहा हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. वसमत व सांगली येथील बाजारापेक्षा येथील बाजार समितीत भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT