Fish Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Dried Fish Rate : कोकणात मागणीमुळे सुक्या मासळीचे दर वधारले

Fish Market : सध्या मासेच कमी मिळत असल्याने सुक्या मासळीचे दर वधारले आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या सुके सोड्यांचे दर किलोला दर्जानुसार अडीच हजारांपासून साडेतीन हजारांवर पोहोचले आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : कोकणात सुक्या व ओल्या मासळीला शहरी व ग्रामीण भागात प्रचंड मागणी असते. सध्या मासेच कमी मिळत असल्याने सुक्या मासळीचे दर वधारले आहेत. यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या सुके सोड्यांचे दर किलोला दर्जानुसार अडीच हजारांपासून साडेतीन हजारांवर पोहोचले आहेत.

जिल्ह्यातील बुरोंडी, हर्णै येथून येणाऱ्या सुक्या मासळीबरोबरच अलिबाग, गुजरातमधील कोलीमही रत्नागिरीतील बाजारात विक्रीसाठी येत आहे. कोळंबी, बोंबिल, चेवना आणि खारा माशांना चाकरमान्यांकडून मागणी वाढली आहे.

एप्रिल, मे महिना संपत आल्यानंतर पावसाळ्यात (Rain) मांसाहारी खवय्यांची अडचण होते. त्यासाठी पुर्वापार चालत आलेल्या आगोटच्या खरेदीकडे लोकांचा कल असतो. ग्रामीण भागातील जनता आठवडा बाजारात सुकी मासळी खरेदी करताना दिसत आहे. व्यवसायिकांनीही खरेदी करणाऱ्याचा कल पाहून आकर्षक पॅकिंगचा फंडा अवलंबला आहे.

चांगल्या प्रतीची सुकी मासळी पॅकिंग करून विकली जाते. त्यात सुके बोंबील, चेवना, बारीक कोलीम, ढोमी, मांदेली, सुरमई, शिंगटा, मुशी, वागळी आदींचा समावेश आहे. सुक्या मासळीच्या दुकानात मासळी घेतली तर ती कमी-अधिक दरात पॅकिंगमध्ये मिळते. सोडे व कोलीम यामध्ये व्यावसायिकांकडून दर्जा राखला आहे. सोडे घ्यायचे झाल्यास त्याची किंमत दर्जानुसार कमी-अधिक आहे.

हर्णे, बुरोंडी येथून येणाऱ्या सुक्या मासळीवर प्रक्रिया करून ती त्या-त्या दर्जानुसार विकतात. गावठी बोंबील, चेवना, खारा मासा, ढोमी आणि कोलीम यांना ग्रामीण भागात अधिक मागणी आहे. कोलिममध्येही वेगवेगळे प्रकार आहेत.

बर्फातून काढलेला कोलिम आणि जाळ्यातून काढून सुकविलेला असे प्रकार आहेत. जाळ्यातून काढलेल्या जवल्याला जास्त मागणी आहे. ग्राहकांना चांगल्या प्रतीचे सुके मासे मिळावेत यासाठी रत्नागिरीतील वासीम दाऊद यांनी विविध प्रकारचे सुके मासे पॅक करून ठेवले आहेत.

पावसाळ्यात सुक्या मासळीचा पर्याय

यंदाचा मासेमारी हंगाम ३१ मे ला संपेल. १ जूनपासून पुढील २ महिने पावसाळ्यात मासेमारी (Fishing) बंद राहील. त्यामुळे बंदीच्या काळात मांसाहार करणाऱ्यांना सुक्या मासळीचा पर्याय असतो. चालू हंगामात विविध कारणांमुळे सुक्या मासळीचे दर वधारलेले आहेत. मात्र आगोटच्या तयारीसाठी गावा-गावातून आठवडा बाजार तसेच सुक्या मच्छी दुकानांतून सुकी मच्छी खरेदी करून बेगमी केली जात आहे.

पॅकिंग केलेल्या सुक्या मासळीचे दर

सुके सोडे दर्जानुसार - २५००, ३००० ते साडेतीन हजार प्रतिकिलो

सुके बोंबील - ७०० रुपये प्रति किलो

खारा बांगडा - २० रुपये नग

सुका कोलीम - ३०० रुपये ते ४०० रुपये प्रतिकिलो

चेवना - ४०० रुपये प्रतिकिलो

सुकी ढोमी - ५०० प्रतिकिलो

सुकी मांदेली - ४०० रुपये प्रतिकिलो

सुका सौंदाळा - ६०० रुपये प्रतिकिलो

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT