Team Agrowon
पावसाळा काही दिवसांवर आला असून दोन महिने खोल समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे.
हंगामाचा शेवट चांगला करण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. मात्र पकडलेली मासळी बाजारात न विकता, सुकवून विकण्याकडे मच्छीमारांचा कल वाढत आहे.
पावसाळ्यासाठी अनेक गृहिणींकडून बेगमी करून ठेवण्यात येत असल्याने सुक्या मासळीची मागणी वाढल्याने दरही गगनाला भिडले आहेत.
कोळीवाड्यात मासळी सुकवण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे रस्त्यांवर बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि करंदी या मासे सुकवण्यासाठी ठेवले आहेत.
वातावरणातील बदलांमुळे खोल समुद्रातील मासेमारीवरही परिणाम झाल्याने मच्छीमारांनी मासळी सुकवण्यास प्राधान्य दिले आहे.
सुट्टीसाठी कोकणात आलेले चाकरमानी सुक्या मासळीची बेगमी जमा करीत आहेत, मात्र वाढलेल्या किमतीमुळे खिशाला कात्री लागत आहे.