Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Bedana Market : बेदाण्याचे दर टिकून; दोन हजार टन आवक

Bedana Rate : बाजारात होळी सणाच्या खरेदीनंतर बेदाण्याला मागणी असून उठावही होत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : बाजारात होळी सणाच्या खरेदीनंतर बेदाण्याला मागणी असून उठावही होत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. शेतकरी बाजारात दराची स्थिती पाहूनच बेदाणा विक्रीस घेऊन येऊ लागला आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. बेदाण्याला प्रति किलोस १०० रुपयांपासून ते २१० रुपये असा दर मिळत आहे.

यंदा बेदाण्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे दर्जेदार बेदाणा झाला. परंतु द्राक्ष हंगामाच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के उत्पादन घटण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर राज्यात बेदाण्याचे उत्पादन किती झाले आहे, याची स्पष्टता होईल. हंगामाच्या सुरुवातीला बेदाण्याचे दर कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा शीतगृहात ठेवला आहे.

दरम्यान, होळी सणानिमित्त बाजारात बेदाण्याला अधिक मागणी असते आणि उठावही असल्याने बेदाण्याच्या दरात किंचित वाढ झाली होती. होळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर १७०० ते १८०० गाडी म्हणजे १७ ते १८ हजार टन बेदाण्याची विक्री झाली. सध्या सांगली, तासगाव, पंढरपूर या बेदाणा बाजारपेठेत २०० गाडी म्हणजे २ हजार टन बेदाणा सौद्यासाठी येत आहे.

त्यापैकी ४० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे. हिरव्या बेदाण्याला प्रति किलोस ११० ते २१०, तर पिवळ्या बेदाण्याला १०० ते १९५ रुपये असा दर आहे. त्यामुळे दरही टिकून आहेत. गेल्या महिन्यापासून बेदाण्याची मागणी वाढली असून उठाव होत आहे. सध्या बेदाणा बाजारात बेदाण्याच्या दरात फारशी तेजी मंदी होण्याची चिन्हे नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले

बेदाणा विक्रीला गती आली आहे. बाजार समितीत सुमारे २ ते अडीच हजार टन बेदाण्याची आवक होते. बेदाण्याचे सौदे सकाळी सुरू झाले की ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सौद्याच्या वेळी उशिरापर्यंत थांबावे लागते. त्यामुळे बाजार समितीने बेदाण्याच्या आवकेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

त्यासाठी कोणत्या व्यापाऱ्यांनी किती कलम विक्रीला आणावी असा निर्बंध लावला तर बेदाण्याची आवक नियंत्रणात राहील आणि बेदाण्याचा उठाव होईल. तसेच दरही चांगले मिळतील, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे.

बाजारात बेदाण्याचे दर टिकून आहेत. दर्जेदार बेदाण्याला चांगले दर असून फारशी तेजी-मंदी होण्याची चिन्हे नाहीत. शेतकऱ्यांनी बेदाण्याची आवक आणि दराची अंदाज घेऊन विक्रीला यावे.
- सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT