Cotton Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : खानदेशात सात लाख कापूस गाठींचे उत्पादन

Cotton Production : आतापर्यंत खानदेशात सुमारे सात लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले असून, कापसाची आवक मागील ५० ते ५५ दिवसांत बऱ्यापैकी राहिली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी असल्याने २२ लाख कापूस गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन साध्य करण्याचे कारखानदार व इतर संस्थांचे उद्दीष्ट पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत खानदेशात सुमारे सात लाख कापूस गाठींचे उत्पादन झाले असून, कापसाची आवक मागील ५० ते ५५ दिवसांत बऱ्यापैकी राहिली आहे.

खानदेशात सध्या प्रतिदिन २८ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी २६ हजार क्विंटल आवक झाली. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ३१ हजार क्विंटल कापसाची आवक झाली.

परंतु आवकेत मागील सात ते आठ दिवसांत काहीशी घट झाली आहे. कारण शेतकऱ्यांकडील कापूससाठा कमी झाला असून, कापूस उत्पादनातही यंदा घट येईल, असे संकेत सुरुवातीपासूनच मिळत आहेत.

नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक प्रतिदिन सरासरी १२ हजार क्विंटल एवढीच होती. कोरडवाहू कापूस पिकात वेचणी डिसेंबरमध्ये वेगात सुरू झाली. याच महिन्यात आवकही बऱ्यापैकी होती. जशी वेचणी झाली, तशी त्याची अनेकांनी विक्री केली.

यामुळे मागील ५० ते ५५ दिवस जिनिंग, प्रेसिंग कारखान्यांतही कापसावर गतीने प्रक्रिया झाली आहे. खानदेशातील कमाल कारखाने ८० ते ९० टक्के क्षमतेने कार्यरत आहेत. तर काही कारखाने वित्तीय अडचणीमुळे कमी क्षमतेने सुरू आहेत. सुमारे १२० कारखाने यंदा सुरू आहेत.

शेतकऱ्यांकडील साठा घटला

खानदेशात शेतकऱ्यांकडे सध्या सुमारे ३५ ते ३३ टक्के कापूससाठा आहे. कमाल कापूस कारखानदारांकडे पोहोचला आहे. त्यावर प्रक्रियादेखील झाली आहे. कापूसदर सतत कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीवर यंदा सुरुवातीपासून भर दिला. नोव्हेंबरमध्ये खानदेशात खेडा किंवा थेट खरेदीत कापसाला ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

डिसेंबरमध्ये सरासरी ६९०० रुपये आणि या महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात सरासरी ६७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत कापसाला मिळाला आहे. दरात सतत घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दर कमी असल्याने अनेक शेतकरी आता शासकीय केंद्रात कापूस विक्रीची तयारी, नियोजन करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT