Papaya Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Khandesh Papaya Market : खानदेशात पपई दरांचा तिढा

Papaya Rate in Khandesh : खानदेशात पपई दरांचा तिढा तयार झाला आहे. शेतकऱ्यांनी थेट खरेदीसंबंधी खरेदीदारांनी दिलेला १५ रुपये प्रतिकिलोचा दर अमान्य केला आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात पपई दरांचा तिढा तयार झाला आहे. शेतकऱ्यांनी थेट खरेदीसंबंधी खरेदीदारांनी दिलेला १५ रुपये प्रतिकिलोचा दर अमान्य केला आहे. किमान २१ ते २२ रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना जागेवर हवा आहे.

पपईचा काढणी हंगाम खानदेशात या महिन्यात जोमात सुरू झाला आहे. यंदा विषम वातावरण व इतर समस्यांमुळे उत्पादन कमी आहे. रोपांच्या टंचाईमुळे पपईची लागवड मे महिन्यात उशिरा झाली आहे. यामुळे आवकही कमी आहे. दुसरीकडे खरेदीदारांकडून दर पाडण्याचे प्रकार सुरू आहेत.

मध्यंतरी शेतकऱ्यांनी सुमारे १५ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मान्य केल्याचे बनावट पत्र समाज माध्यमांत व्हायरल झाले. यास शेतकऱ्यांनी विरोध केला. हा खोडसाळपणा कुणीही करू नये, १५ रुपये दर अमान्यच आहे. पपईचा उत्पादन खर्च यंदा वाढला आहे. जागेवर २१ ते २२ रुपये प्रतिकिलोचा दर हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

खानदेशातील पपईला उत्तर भारतात मोठी मागणी आहे. उठाव वाढला आहे. अशात खरेदीदारांनी दर पाडण्याचा प्रकार सुरू केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्यंतरी दर ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो देखील होते.

त्यात काही दिवसांत मोठी घट कशी शक्य आहे, असा प्रश्नही पपई उत्पादकांनी उपस्थित केला. यात प्रशासन, जिल्हा उपनिबंधक कार्यालयांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विविध फळ बागायतदार संघ, शेतकरी गटांनी केली आहे.

पपईची काढणी ठप्प

मध्यंतरी शहादा (जि.नंदुरबार) येथील पपई उत्पादकांनी खरेदीदार, व्यापाऱ्यांशी दरांबाबत चर्चा केली. परंतु दरांचा तिढा कायम आहे. यासंबंधी तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद ठेवली आहे.

कुण्याही खरेदीदारास १५ रुपये प्रतिकिलो दरात पपईची विक्री करू नका, अशा सूचना विविध संघटना, शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे पपईची काढणी खानदेशात ठप्प असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT