Agriculture Market Products Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast: शेवग्याचा भाव तेजीत; लसूण, दोडका, कोबी तसेच काय आहेत आजचे बटाटा भाव?

Daily Commodity Rates: आज आपण लसूण, दोडका, शेवगा, कोबी आणि बटाटा बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin:

लसूण तेजीत

लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. बाजारतील लसणाची आवक वाढलेल्या पावासामुळे कमी झाली होती. मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे लसणाच्या भावात दोन आठवड्यांमध्ये सरासरी ५०० ते १ हजार रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये सध्या ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. तसेच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

दोडक्याला उठाव

बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. तर दोडक्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे दोडक्याच्या भावातही सुधारणा दिसून आली. दोडका पिकालाही सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. आवक कमी आणि चांगली मागणी यामुळे दोडक्याचा बाजार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. दोडक्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

शेवग्याला मागणी

बाजारात सध्या शेवग्याची आवक मर्यादीत स्वरुपात होत आहे. तर शेवग्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे शेवग्याच्या दरात सुधारणा दिसून आली. राज्यातील बाजारात शेवगा आवक मागणीपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे शेवगा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात बाजारातील शेवगा आवक कमी होण्याचा अंदाज आहे. वादळी पावसाचा शेवगा पिकाला फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्याचा परिणाम आवकेवर होऊ शकतो. त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज शेवगा व्यापारी व्यक्त करत आहेत.

कोबीचे दर दबावात

बाजारात कोबीची आवक चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादीत दिसत आहे. याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे. कोबीचे दर मागील काही आठवड्यापासून दबावातच दिसत आहेत. वाढत्या आवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात ४०० ते ७०० रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत. बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कोबी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

बटाटा दर टिकून

देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढले आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावला. बटाट्याला पुढे मागणीही चांगली आहे. त्यामुळे दरही स्थिरावले आहेत. सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT