पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १३) भाजीपाल्याची (vegetables) सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ५ टेम्पो गाजर, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंगा, हिमाचल प्रदेशातून मटार १ तर मध्य प्रदेशातून ६ टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी १ टेम्पो, बंगलोर येथून १ टेम्पो आले, तर मध्य प्रदेशातून लसूण सुमारे १० ट्रक आवक झाली होती.
तर स्थानिक भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे दीड हजार, टोमॅटो सुमारे ११ हजार क्रेट्स, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी १० टेम्पो, हिरवी मिरची, कोबी आणि गाजर प्रत्येकी ५ टेम्पो, मटार २५ गोणी, भेंडी पाच आणि गवार ७ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, आग्रा, इंदूर, स्थानिक भागांतून बटाटा ७० ट्रक आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : १५०-२८०, बटाटा : १७०-२३०. लसूण : १५०-५००, आले : १५०-३५०, भेंडी : २५०- ३५०, गवार : गावरान व सुरती २००-३००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : १००-१५०, वांगी : २५०-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली :
कळी ३५०-४००, जाड : १५०-२००, शेवगा : १०००-१२००, गाजर : २००-४००, वालवर : ३५०-४५०, बीट : २८०-३००, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ५००-५५०, मटार : ७५०-९००, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे तीन लाख, तर मेथीची ६० हजार जुड्यांची आवक झाली होती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ३००-१०००, मेथी : ६००-१२००, शेपू : ३००-८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ४००- ६००, पुदिना : २००-६००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ५००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ८००-१२००.
फुलबाजार
थंडीमुळे फुलांच्या आवकेत घट झाली असून, लग्न हंगामातील तारखा अजून सुरू न झाल्याने मागणीदेखील कमी होती. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-४०, गुलछडी : ४०-५०, ॲस्टर (५ जुड्या) ः २०-३०, कापरी : ३०-४०, शेवंती : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ५-१०, डच गुलाब (२० नग) : ८०-१००, जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१२०, ग्लॅडिएटर २०-३०.
फळबाजार
फळबाजारात रविवारी (ता.१३) लिंबाची सुमारे २ हजार गोणी आवक झाली होती. इतर आवकेमध्ये डाळिंब २० टन, पपई १० टेम्पो, चिकू १ हजार गोणी आणि बॉक्स, मोसंबी ७० टन, संत्रा ३० टन, पेरू सुमारे १ हजार क्रेट, कलिंगड ३, तर खरबूज २ पिकअप, सीताफळ ६० टन आवक झाली होती. तर सोलापूर जिल्ह्यांमधून विविध बोरांची सुमारे १०० गोणी आवक झाली होती.
विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (गोणीस) - १५०-३००, डाळिंब (किलो) गणेश - १०-५०, भगवा ७०-२५०, आरक्ता २०-८०, पपई प्रति किलो -१०-३५, पेरू (२० किलो) -२५०-३५०, सीताफळ - १०-१००, कलिंगड १५-२५ खरबूज २५-४०, मोसंबी ३ डझन २४०-४००, ४ डझन १००-२५०. संत्रा (१० किलो) २००-७००. बोरांची प्रति १० किलोचे दर चण्यामण्या - ५००-६००, चेकनट १०००-११००, चमेली २७०-३००, उमराण १०० ते १२०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.