Betel Leaf  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf Price : खाऊच्या पानांचे दर टिकून

Market Update : गेल्या आठवड्यापासून पानांच्या प्रति डागासाठी ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर येत्या महिनाभर दर टिकून राहतील, असा अंदाज पान उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी राज्यातील विविध पानांच्या पेठांत खाऊच्या पानांची मागणी वाढली असून, काहीसा उठावही होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पानांच्या प्रति डागासाठी ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर येत्या महिनाभर दर टिकून राहतील, असा अंदाज पान उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दसरा, दिवाळीच्या दरम्यान, पानांच्या बाजारपेठेत पानांची आवक कमी असून, उठावही चांगला झाला होता. त्यामुळे खाऊच्या पानांच्या दरात वाढ झाली होती. या काळात १५०० ते ५ हजार रुपये प्रति डाग असा दर होता. सुमारे पंधरा दिवस पानांचे दर टिकून राहिले होते. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना या दरवाढीचा दिलासा मिळाला होता. या काळात पानांच्या पेठात खाऊच्या पानांची आवक कमी असल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

मात्र नोव्हेंबरच्या मध्यापासून गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, लातूर, पंढरपूर यांसह गुजरात, कर्नाटकातील पानांच्या पेठांमध्ये पानांची आवक कमी-अधिक होत आहे. त्यामुळे या काळात पुन्हा पानांच्या दरात घसरण झाली होती. या पंधरा दिवसांत पानांना प्रति डागास १५०० ते ३००० रुपये असा दर होता. परिणामी, पानांच्या दरातील घसरणीमुळे उत्पादकांत धास्ती निर्माण झाली होती.

मार्गशीर्ष महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी वाढली असून उठावही होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पानांच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी पानांना मोठी मागणी असते. त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवसांत पानांच्या काढणीचे नियोजन शेतकरी करतात. सध्या पानांच्या प्रति डागासाठी ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

पानांचे दर (एका डागात १२ हजार पाने)

कळी १२०० ते ३५००

फाफडा १६०० ते ४५००

हक्कल १२०० ते १४००

सातत्याने पानांच्या पेठात पानांची मागणी आणि उठाव कमी होत आहे. परिणामी पानांचे दर कमी-अधिक होत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक ताळमेळ बसत नाही.
भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, जि. सांगली
मार्गशीर्ष महिना असल्याने गेल्या आठवड्यापासून पानांच्या दरात सुधारणा झाली आहे. महिनाभर पानांचे दर टिकून राहतील असा अंदाज आहे.
संदीप कणसे, पान व्यापारी, बेडग, ता. मिरज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT