Cashewnut Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cashewnut Market : काजू बी आवक वाढली, दरात घसरण

या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजूला पालवी आणि मोहोर उशिराने आला. त्यामुळे दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणार काजू हंगाम या वर्षी जानेवारी अखेरीपर्यंत सुरू झाला नाही.

Team Agrowon

Cashewnut Market सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील आठवडा बाजारांमध्ये काजू बीची आवक (Cashewnut Arrival) वाढली आहे. आवक वाढल्यामुळे काजू बीच्या दरात (Cashewnut Rate) प्रतिकिलो ५ रुपयांनी घसरण होऊन सध्या प्रतिकिलो १२० रुपयांनी काजू बीची खरेदी (Cashewnut Procurement) व्यापाऱ्यांकडून सुरू आहे.

या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजूला पालवी आणि मोहोर उशिराने आला. त्यामुळे दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणार काजू हंगाम या वर्षी जानेवारी अखेरीपर्यंत सुरू झाला नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून काही भागांत काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर आठवडाभराने काजू बी खरेदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बांदा बाजारपेठेत काजू बीची खरेदी सुरू झाली. सुरुवातीला प्रतिकिलो १२० रुपयांनी काजू बी खरेदी करण्यास सुरुवात केली.

परंतु फेब्रुवारी अखेरीपर्यंत काजू बीची अपेक्षित आवक बाजारपेठेत झाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काजू बीच्या दरात पाच रुपयांनी वाढ करीत प्रतिकिलो १२५ रुपये दर केला. काही बाजारपेठेत तर प्रतिकिलो १३० रुपयांनी देखील खरेदी झाली.

मात्र गेल्या आठवड्यापासून आठवडा बाजारपेठेमध्ये काजू बीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत चार ते पाच पटीने काजू बीची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी दर पुन्हा कमी केले. त्यामुळे कालपासून प्रतिकिलो १२० रुपयांनी दराने काजू बी खरेदी केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT