Lemon  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Lemon Market : लिंबाचे दर दहा हजार रुपये क्‍विंटलवर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मॉन्सूनोत्तर तसेच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने लिंबाचा हस्त बहार प्रभावित झाला. त्यानंतरच्या काळात आंबिया बहाराची फळधारणा झाली. या बहारातील फळे मार्च अखेरीस परिपक्‍व होतात. परिणामी सध्या बाजारात आवक कमी असल्याने लिंबाचे दर ९००० ते १००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. किरकोळ बाजारात लिंबाचे व्यवहार १०० रुपये किलोने होत आहेत.

अमरावती बाजारात तीन महिन्यांपासून लिंबाची आवक २० क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. आता त्यात पुन्हा घट होत ही आवक अवघ्या दहा क्‍विंटलवर आली आहे. त्या तुलनेत ग्राहकांची मागणी अधिक असल्याने लिंबाचे दर चांगलेच वधारले आहेत.

अमरावती बाजारात (Amravati Bazar) लिंबाला घाऊक ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर आहे. प्रतिकिलो लिंबाचे दर १०० रुपयांपेक्षा अधिक आहेत. परिणामी यंदा हस्त बहारातील लिंबाची फळधारणा झालेल्या शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत मार्च महिन्याच्या सुरवातीला लिंबाची आवक २० क्‍विंटल इतकी होती. त्यानंतर त्यात वाढ नोंदविली गेली. लिंबाची आवक ४० वरून ५० क्‍विंटल आणि मधल्या काळात ती अवघी १२ क्‍विंटल इतकीही राहिली. त्यामुळे दरातही चढउतार होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मध्यंतरी कळमनामध्ये दर ८००० ते ९००० रुपयांवर पोचले होते. आता लिंबाला ६००० ते ८००० रुपयांचा दर मिळत आहे. आंबिया बहारातील फळांची बाजारातील आवक मार्च अखेरीस होण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम दरावर होईल, अशी शक्‍यता आहे.

मॉन्सूनोत्तर आणि अवकाळी पावसाचा फटका हस्त बहाराला बसला. अपेक्षित फूल आणि फळधारणा झाली नाही. परिणामी बाजारात लिंबाची आवकच मंदावली आहे. त्यामुळे प्रतिकिलो १०० रुपये मिळत आहे. यापुढील काळात आंबिया बहारातील फळांचा पुरवठा बाजारात झाल्यास दरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
- अंकुश झंझाट, लिंबू उत्पादक, माहुली (चोर), अमरावती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT