Team Agrowon
मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या परिणामी अवेळी ताण तुटल्याने लिंबाचा हंगाम लांबला आहे. त्यामुळे बाजारात लिंबाच्या दरात चांगलीच तेजी आली आहे.
दर तब्बल दहा हजार रुपये क्विंटलवर पोचले आहेत. एप्रिलपर्यंत अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नजीकच्या काळात दर १२ हजार ५०० रुपयांवर पोचतील, अशी शक्यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली आहे.
तापमानात वाढ झाल्याने ग्राहकांकडून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच बाजारात लिंबाचे दर तेजीत आले आहेत.
महिन्याच्या सुरवातीला ४००० ते ६००० रुपयांचा दर लिंबाला असताना आता हे दर थेट १० हजार रुपये क्विंटलवर पोचले आहेत.
किरकोळ बाजारात तर यापेक्षा अधिक दराने लिंबे विकली जात आहेत. सरासरी १२० रुपये किलोने लिंबाचे व्यवहार होत आहेत.
नागपूरच्या कळमना बाजारात सध्या २० क्विंटल इतकी अत्यल्प आवक असून या ठिकाणी देखील दर ५००० ते ९००० रुपयांवर पोचले आहेत.