Chana Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : हरभरा विक्रीपूर्व नोंदणीचे पोर्टल अद्याप सुरू नाही

राज्यात रब्बी हंगाम २०२२-२३ साठी किमान हमीदरानुसार हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार राज्यात आठ लाख १० हजार टन शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

Team Agrowon

Chana Market Update नांदेड : राज्यात नाफेडच्या (NAFED) माध्यमातून किमान हमीदरानुसार (Chana MSP) (एमएसपी) हरभरा खरेदी (Chana Procurement) १४ मार्चपासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी २७ फेब्रुवारीपासून होईल, असे शासनाने कळविले.

परंतु नोंदणीचे पोर्टल अद्याप सुरू केले नसल्यामुळे ऑनलाइन नोंदणीचे काम रखडले आहे. शेतकरी मात्र नोंदणीसाठी तगादा लावत असल्याचे चित्र खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.

राज्यात रब्बी हंगाम २०२२-२३ साठी किमान हमीदरानुसार हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

या योजनेनुसार राज्यात आठ लाख १० हजार टन शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. यासाठी विक्रीपूर्व ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू केली आहे.

ही नोंदणी प्रक्रिया १५ मार्चपर्यंत चालू राहील. तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीची तारीख १४ मार्च निश्‍चित करण्यात आली आहे. परंतु ‘नाफेड’कडून काही एसएलएच्या संस्था वगळता पाच दिवसांचा कालावधी गेल्यानंतरही अद्याप अनेक खरेदी संस्थांचे पोर्टल सुरू केले नाही.

यामुळे शेतकऱ्यांचे कागदपत्र गोळा केलेल्या संस्थांना शेतकऱ्यांची विक्रीपूर्व नोंदणी करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या बाबत खरेदी संस्थांनी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले आहेत. यात शासनाने हस्तक्षेप करून ‘नाफेड’मार्फत सुरू होणारी हमीदर खरेदी प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी अनेक शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT