Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : आठवडाभरात सोयाबीन दरवाढीची शक्यता

आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल सुमारे शंभर रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनच्या दरात किंचित घट झालेली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः आठवडाभरात सोयाबीनचे भाव (Soybean Rate) प्रतिक्विंटल सुमारे शंभर रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनच्या दरात (Soybean Market Rate) किंचित घट झालेली आहे. परंतु शेतकरी माल रोखून ठेवत टप्प्याटप्प्याने तो बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारावर आवकेचा (Soybean Arrival) दबाव नाही. तसेच मलेशियात पामतेलाच्या किमतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक सुरू झाली, तेव्हा दर दबावात होते. आवक सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये सोयाबीन सुमारे १५ टक्के घसरले. काही बाजारपेठांमध्ये चार हजार रुपये क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला. सोयाबीनचा हमीभाव ४३०० रुपये आहे. परंतु नंतरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात नेणे बंद केले आणि साठवणूक करू लागले. त्यामुळे पुढील तीन आठवड्यांत सोयाबीन परत साडेपाच-सहा हजाराजवळ पोहोचले. परंतु गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर परत किंचित कमी झाले.

मलेशियात पामतेलाच्या किमतीत ३ टक्के वाढ झाली आहे. क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणही थांबली आहे. सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल ही उत्पादने तयार होतात. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोयातेलाची थेट स्पर्धा पामतेलाशी असते. त्यामुळे पामतेलाचे दर वाढले की सोयाबीनला थेट फायदा होतो.

सोयापेंड निर्यातीच्या बाबतीत मात्र फारसे उत्साहाचे चित्र नाही, असे जाणकारांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोयापेंडच्या किमतीत पडतळ आल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निर्यातीसाठी करार झाले. परंतु नंतर मात्र निर्यात करारांत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनला सोयापेंडीच्या आघाडीवर फारसा आधार सध्या मिळत नाही आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील वाढ मर्यादित राहील.

शेतकरी हुशारीने रोखला माल

गेल्या आठवडाभरात इंदूर मार्केटला सोयाबीनचे दर ५६९८ रुपयांवरून ५५३४ रुपयांवर आले. तर अकोला मार्केटला सोयाबीन ५८५८ वरून ५६१८ रुपयांवर आले. काही मार्केटमध्ये दर ५४०० रुपयांवरही पोहोचले होते. परंतु या दरपातळीवत आता शंभर रुपयांची वाढ होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. कारण शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारात आवक वाढत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव किमतीला सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवेल.

दरात फार घटही येणार नाही अन् तेजीही

थोडक्यात सोयाबीनचे दरात फार पडझड होणार नाही, तसेच मोठी तेजीही येणार नाही; तर आठवडाभरात सोयाबीनच्या दरात शंभर रुपयांची वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाच हजार ते सहा हजाराच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकणे फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT