Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : हंगामाच्या प्रारंभीच डाळिंबाचे दर दबावात

Pomegranate Market : आगाप मृग बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. डाळिंबाची आवक कमी आहे. मात्र बाजारपेठेत इतर फळांची आवक वाढली असल्याने त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाला पावसाचे ग्रहण लागले. पावसापासून ज्या बागा वाचल्या त्या बागा चांगल्या बहरल्या आहेत. आगाप मृग बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. डाळिंबाची आवक कमी आहे. मात्र बाजारपेठेत इतर फळांची आवक वाढली असल्याने त्याचा परिणाम डाळिंबाच्या दरावर झाला आहे.

हंगामाच्या प्रारंभी डाळिंबाला सरासरी प्रति किलोस १०० रुपये असा दर मिळत आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला प्रति किलोस ५ ते १० रुपयांनी दर कमी आहेत. डाळिंबाच्या दराची स्थिती सद्यःस्थितीला कसे राहतील याचा अंदाज आताच लावणे कठीण असल्याचे डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात यंदाच्या मृग बहरात सुमारे ७५ हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी साधल्या आहेत. मात्र बागा धरल्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या पावसामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ३० टक्के बागांवर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव आहे. तेलकट रोगामुळे फळ खराब होते. परिणामी, सुमारे डाळिंबाच्या २० टक्के उत्पादन कमी शक्य आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिपावसामुळे डाळिंब बागा बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. यादरम्यान, फूल सेटिंगला अडथळे निर्माण झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही काटेकोर नियोजनातून बागा साधल्या आहेत.

देशभरातील डाळिंब उत्पादन घेणाऱ्या राज्यात शाश्‍वत पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी आगाम मृग बहर धरला जातो. यंदाच्या आगाप मृग बहर अंदाजे ३५०० ते ४००० हेक्टरखाली क्षेत्र आहे. आगाप बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. दक्षिण भारतासह बांगलादेशात डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. सध्या डाळिंब काढणीचे प्रमाण कमी असून, बाजारात आवकही कमी आहे. मागणीही बरी आहे.

गतवर्षी मृग बहरातील हंगामाच्या प्रारंभाला डाळिंबाला १०५ ते ११० रुपये असा दर मिळाला होता. दरम्यान, देशभरातील फळ बाजारपेठेत इतर फळांची आवक किंचित वाढली असल्याने डाळिंबाच्या दरावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभीच डाळिंबाच्या दरात प्रति किलोस ५ ते १० रुपयांनी दर कमी मिळत आहे. सध्या बाजारात दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

गेल्या आठवड्यापासून डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने डाळिंबाचा दर्जा आणि अपेक्षित दर मिळू लागले आहेत. त्यामुळे सध्यातरी नैसर्गिक संकट नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डाळिंब विक्रीचा हंगाम सुरू झाला असला तरी, त्याला फारशी गती आली नाही. येत्या आठवड्यात डाळिंब खरेदीसाठी व्यापारी दाखल होतील. पुढील पंधरा दिवसांनंतर डाळिंब काढणीला गती येईल.

प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी डाळिंब फुलवले आहे. पोषक वातावरणामुळे डाळिंब चांगले आहेत. मात्र इतर फळांची आवक असल्याने डाळिंबाचे दर कमी झाले आहेत. डाळिंबाची युरोपला निर्यात अजून सुरू झाली नाही. मागणीनुसार निर्यातही सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रभाकर चांदणे, अखिल भारतीय डाळिंब संघ
डाळिंबाला बाजारपेठेत मागणी आहे. सध्या आवक कमी असून, दर चांगले मिळणे अपेक्षित होते. परंतु दर कमी झाले आहेत. येत्या काळात डाळिंबाला चांगले दर मिळतील अशी आशा आहे.
रूपेश गायकवाड, डाळिंब उत्पादक, शेटफळे, ता. आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT