Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Price: डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १७५ रुपये दर

Fruit Market: डाळिंबाच्या बाजारपेठेत मागणी वाढली असून, प्रति किलो १०० ते १७५ रुपये दर टिकून आहे. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: बाजारपेठेत डाळिंबाची आवक आणि मागणी चांगली असल्याने हस्त बहारातील डाळिंबाचे दर टिकून आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंबावर बसू लागला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत डाळिंबाचे दर टिकून राहण्याचा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १७५ रुपये असा दर मिळत आहे.

यंदा राज्यात ३० हजार हेक्टरवर डाळिंबाचा बहार शेतकऱ्यांनी धरला असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगाप हस्त बहारातील डाळिंबाची विक्री सुरू झाली. बाजारात डाळिंबाची मागणी असूनही उठावही चांगला होत आहे. त्यामुळे डाळिंबाला चांगले दर मिळत आहेत.

दर्जेदार डाळिंबाला प्रति किलोस १०० ते १७५ रुपये असा दर आहे. सद्यःस्थितीला एकूण क्षेत्रापैकी २५ टक्के म्हणजे ७५०० हेक्टरवरील डाळिंबाची काढणी उरकली आहे. हंगामाला गती आली आहे. दिवसेंदिवस तापमान वाढू लागले आहे. उन्हामुळे डाळिंबाला सनबर्निंगचा प्रादुर्भाव होवू लागला असल्याने डाळिंबाचे दाणे पांढरे होणे अशी समस्या उद्भवण्याची समस्या काही प्रमाणात होवू लागली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा फटका डाळिंबाला बसू लागला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वास्तविक पाहता गेल्या दोन महिन्यांपासून डाळिंबाचे दर टिकून आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

गुजरात, राजस्थानमध्ये डाळिंबाला फटका

या दोन्ही राज्यांत हस्त बहार धरला जातो. मात्र, नैसर्गिक आपत्तीचा फटकाही या दोन्ही राज्यांतील डाळिंबाला बसला आहे. त्यामुळे फुलगळ, अपेक्षित फळांची संख्या मिळाली नाही. त्यातच अति उष्णतेचाही फटका बसल्याने या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची आवक राज्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील डाळिंबाची उठाव होत असून दर चांगले मिळत आहे.

गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची आवक नसल्याने हंगामाच्या प्रारंभापासून दर टिकून आहेत. येत्या काळात डाळिंबाचे दर स्थिर राहिली असा अंदाज आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT